गॅस एजन्सीच्या कामगाराकडूनच चौदा लाख रुपयांची रोकड लंपास

दत्तवाडी पोलिस ठाण्यात कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल
crime
crimesakal

पुणे: बॅंकेत भरणा करण्यासाठी दिलेली लाख हजारांची रोकड चोरून पसार झालेल्या पर्वती भागातील एका गॅस एजन्सीतील कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला. हि घटना सोमवारी सकाळी पर्वती पायथा परिसरात घडली. याप्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान दिनानिमित्त शैक्षणिक कार्यक्रम

गजेसिंह उमेदसिंह राठोड (वय 26, रा. अप्पर बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पर्वती येथील ढमढेरे गॅस एजन्सीचे मालक स्वप्नील ढमढेरे (वय 43, रा. विधी महाविद्यालय रस्ता) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ढमढेरे यांच्या गॅस एजन्सीचे कार्यालय पर्वती पायथा परिसरात आहे. त्यांच्याकडे मुळचा राजस्थान येथील असलेला गजेसिंह हा कामगार मागील पाच वर्षांपासून काम करीत आहे. एजन्सी कार्यालयातील कामांसह तो गॅस दुरूस्तीचीही कामे करतो.

crime
उपमुख्यमंत्र्यांकडून रिक्षाचालकांच्या प्रश्‍नांबद्दल बैठकीचे आश्‍वासन

त्यामुळे ढमढेरे यांनी सोमवारी सकाळी गजेसिंह यास 14 लाख 13 हजार 160 रुपये वडगाव बुद्रुक येथील एका बॅंकेत भरणा करण्यासाठी दिले होते. त्यानुसार, तो 14 लाखांची रोकड घेऊन गॅस एजन्सीच्या कार्यालयातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने त्याच्याकडील रोकड बॅंकेत जमा न करता तो पळून गेला. कामगार कार्यालयात परत न आल्याने ढमढेरे यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्याचा मोबाइल क्रमांक बंद लागला. त्यांनी सायंकाळपर्यंत त्याची वाट पाहिली, तरीही कामगार परत आला नाही. अखेर ढमढेरे यांनी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com