ग्रामीण भारतासाठी युवकाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - मोठ्या पगाराची नोकरी सोडून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांना एकत्र करून युवा सक्षमीकरण व समाजपरिवर्तनासाठी प्रफुल्ल निकम या मराठी युवकाने वाय फोर डी फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. शहर व ग्रामीण भागात कौशल्य विकास प्रशिक्षण, शाळांमध्ये संगणकीकरण, लहान मुलांसाठी खेळ, महिलांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांतून त्याने देशात युवकांचे जाळे निर्माण केले.

त्याच्या या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, फाउंडेशनच्या जून महिन्यात होणाऱ्या ‘न्यू इंडिया कॉन्क्‍लेव्ह’ या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. 

या संदर्भात  ‘सकाळ’शी बोलताना प्रफुल्ल म्हणाला, ‘‘मी मूळचा वाशीम जिल्ह्यातील मंगरूळनाथ तालुक्‍यातील अरक गावचा. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आईवडिलांनी शेती विकून मला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन’ची पदवी घेतल्यानंतर मी दिल्ली, दुबई येथे काम केले. त्यानंतर २०१० मध्ये पुण्यात स्थिरावलो.

युवकांना समाजकार्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सक्षमता, रोजगार आणि प्रोत्साहन’ या तीन सूत्रांवर आधारित वाय फोर डी फाउंडेशनची २०१५ मध्ये स्थापना केली. सध्या मी मोठ्या पगाराची नोकरी सोडून पूर्णवेळ वाय फोर डीचे काम पाहतोय. तीन वर्षांत आमची संस्था देशातील एकूण ३० राज्यांमध्ये कार्यरत असून, सभासद संख्या सहा हजारांपेक्षा जास्त आहे.’’ 

‘‘आमच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घ्यावी, यासाठी आम्ही राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पाठवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण, युवक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे नियोजन केले. त्यानुसार देशातील ५० हजार गावांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

त्यातील एक भाग म्हणून येत्या जून महिन्यात दिल्लीमध्ये ग्रामीण भारतासाठी ‘न्यू इंडिया कॉन्क्‍लेव्ह’ पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये आदर्श ग्राम, आदर्श शेतकरी, ग्रामोद्योग, समाजसेवक या विभागांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या युवा नेतृत्वांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार केला जाईल. ऑनलाइन स्पर्धेद्वारे नामांकनांतून या सत्कार्थींची निवड केली जाणार आहे.’’

Web Title: rural india youth initiative