ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बुक्‍स फॉर चेंज प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी ‘टच अ लाइफ फाउंडेशन’तर्फे ‘बुक्‍स फॉर चेंज’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना सुमारे ३० हजार पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सोईसुविधा पोचविण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. 

या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करू इच्छिणारे देणगीदार, सामाजिक संस्था, शाळा आणि स्वयंसेवक यांना एकत्र आणण्यात येणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासह आरोग्यसेवा, शैक्षणिक मदत आणि रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे नरेश सुराणा आणि सीमा सुराणा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सुराणा म्हणाले, ‘गेल्या वर्षी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना २५ हजार पुस्तकांचे वाटप केले होते. या वर्षी ३० हजार पुस्तके वाटण्यात येतील. त्यासाठी विविध अभ्यासगट तयार करण्यात येतील. तसेच देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि इतर सोईसुविधांसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. यातून देशभरातील विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलद्वारे गोळा केली जाणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. आम्ही २५ शाळांमधील 
सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांची माहिती मिळविली आहे. ही माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.’’

 नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
 तीस हजार पुस्तकांचे वाटप करणार
 विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिक मदत
 आरोग्यसेवाही पुरविणार

Web Title: Rural Student Books for change project