अंगारकीनिमित्त ओझरला भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जुन्नर : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी यशवंत कवडे, खजिनदार किसन मांडे, सचिव गोविंद कवडे, विश्वस्त देविदास कवडे, पांडुरंग जगदाळे, बाळासाहेब कवडे, विक्रम कवडे, प्रकाश मांडे, साहेबराव मांडे, बबन मांडे, अनिल मांडे, शंकर कवडे, ज्ञानेश्वर कवडे ग्रामस्थ अविनाश जाधव तसेच प्रमुख नरेंद्र पाठक उद्योजक कल्याण यांचे हस्ते श्री चा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी सकाळी ठीक ४.०० वाजता खुले करण्यात आले.

जुन्नर : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी यशवंत कवडे, खजिनदार किसन मांडे, सचिव गोविंद कवडे, विश्वस्त देविदास कवडे, पांडुरंग जगदाळे, बाळासाहेब कवडे, विक्रम कवडे, प्रकाश मांडे, साहेबराव मांडे, बबन मांडे, अनिल मांडे, शंकर कवडे, ज्ञानेश्वर कवडे ग्रामस्थ अविनाश जाधव तसेच प्रमुख नरेंद्र पाठक उद्योजक कल्याण यांचे हस्ते श्री चा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी सकाळी ठीक ४.०० वाजता खुले करण्यात आले.

सकाळी ७.३० वा महाआरती करण्यात आली १२.०० मध्यान्ह आरती करण्यात आली ८.०० वा नियमाचे पोथी वाचन करण्यात आले.आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टने पार्किंग व्यवस्था , सभामंडपामध्ये दर्शनरांग मंदिरातील दर्शनरांगेवर उन्हापासून  संरक्षणासाठी मंडप,पिण्याचे थंड पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमीवृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग, चप्पल स्टॅन्ड, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.

या निमित्त प्रवेशद्वार ते वाहनतळा गर्दीचे नियोजन करण्यात आले .पेढ्यांची दुकाने,खेळणी,संसारपयोगी वस्तू,हार फुले,कटलरी ही दुकाने मांडली गेली त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले.या दरम्यान निष्काम सेवा आळंदी या संस्थेच्या सेवकांनी मंदिर व मंदिर परिसराची स्वच्छता केली.

मंदिरामध्ये  रोहिदास हनुमंत मांडे ओझर यांनी फुलांची सजावट केली. सायंकाळी ७.०० वा नियमित हरिपाठ करण्यात आला ९.३२ ते चंद्रोदयापर्यंत ह.भ.प शिवनेर भुषण विठ्ठलबाबा मांडे यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ शिरोली खु!! यांनी दिली.वारकऱ्यांना अन्नदान रंगनाथ बाबुराव रवळे यांनी केले.रात्रौ ७.३० ते ११ पर्यंत दोन हजार भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले.

पहाटे ४ ते रात्रौ ११ पर्यंत दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.

महाप्रसादाचे देणगीदार - प्रविण अंनतराव चौघुले आळेफाटा २१०००, जयंत म्हैसकर अंधेरी मुंबई २१०००, शिवाजी माणिक ढाकणे ६६६५. देणगीदार, अरविंद भालेराव,चांदवड नासिक १ किलो चांदी (४१०००रु), अंबादास सुत सोनकर टाकळी रोड नाशिक,११,१११ रु.   

दर्शनासाठी आलेले मान्यवर- मा.नरेंद्र पाठक उद्योजक कल्याण, अविनाश अभ्यंकर प्रवक्ते-नेते मनसे, अनिल चितळे, संपर्क प्रमुख नगर जिल्हा मनसे, संदीप पाचंगे प्रमुख विद्यार्थी सेना मानसे, विजय रजपूत राज्य उपाध्यक्ष माथाडी कामगार, बी.डी.कुलकर्णी जिल्हा न्यायाधीश कोल्हापूर डॉक्टर विजय कुमार फड विभागीय आयुक्त महसूल विभाग पुणे,मोरया प्रतिष्ठान घारगाव ते ओझर पायी दिंडी सोहळा निलेशशेठ कोकाटे घारगाव, लक्ष्मीताई जावळेकर ,ज्वेलर्स घोरपडी पुणे. विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील  शेरकर   

गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ,अध्यक्ष व कर्मचारी वर्ग व ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बनसोडे व कर्मचाऱ्यांनी  केले. 

Web Title: rush at ozar due to angaraki chaturthi