अखेर शाळेनं घेतलं नमतं; ब्लॉक केलेल्या 'त्या' विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सुरू!

Ryan_International_School
Ryan_International_School

पुणे : शुल्क भरले नाही (School Fee) म्हणून रायन इंटरनॅशनल स्कूलने (Ryan International School) विद्यार्थ्यांना ब्लॉक करून त्यांचे शिक्षण बंद केले होते, मात्र पालकांनी आवाज उठवल्याने आणि बावधन (Bavdhan) ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्याने शाळेने नमते घेत शुक्रवार (ता.७)पासून पुन्हा एकदा ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत.

बावधन येथे रायन इंटरनॅशनल स्कूलने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे, पण संपूर्ण शुल्क भरा अशी मागणी केली जात होती. पालकांनी ज्या सुविधा वापरण्यात येते नाहीत त्याचे पैसे न देता केवळ शैक्षणिक शुल्क भरण्याची तयारी दाखवली. त्यामुळे शाळेने ज्यांनी शुल्क भरले नाही, अशांना ब्लॉक करून ऑनलाईन शिक्षण बंद केले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पालकांनी विरोध सुरू केला. 

तसेच बावधन ग्रामपंचायतीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेला नोटीस काढून शाळेचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, त्वरीत सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करावे, अन्यथा तुमच्या सेवा बंद केल्या जातील अशी तंबी दिली होती. यानंतर शाळेने ऑनलाईन शिक्षण सुरू करणार असल्याचे ग्रामपंचायतीला सांगितले, असे सरपंच पियुषा दगडे यांनी सांगितले. 

याबाबत पालक-शिक्षक समितीच्या सदस्या प्रज्ञा सहस्रबुद्धे म्हणाल्या, "शाळेने शुल्क भरले नाही म्हणून शिक्षण बंद केले होते. आता तीन दिवसानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले आहे. मात्र, शुल्कासंदर्भात शाळेकडून अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. शाळेने पालकांची स्थिती समजून घ्यावी, आम्हीही शाळेला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com