
उंड्री-पिसोळी ः कोंढवा बुद्रुकमधून येवलेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत १९८५ साली स्वतंत्र झाली. मात्र, फेरफारनुसार स.नं.६७ येवलेवाडीमध्ये न दाखवता तो कोंढवा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये दाखविला जात असल्याने ६७ स.नं.मधील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने त्याची दुरुस्ती करून सहकार्य करावे, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी सांगितले की, तहसिलदार यांच्याकडे येवलेवाडी जुना स.नं.१०६ असून, नवीन स.नं.६७ नंबर कोंढवा ब्रु मधील आहे. कोंढवा बुद्रुकमधून २६ ऑगस्ट १९८५ साली येवलेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. यावेळी कोंढवा ब्रुमधुन वरील स.नं. येवलेवाडीमध्ये दाखविण्यासाठी येवलेवाडीचा एक नंबर फेरफार तयार करण्यात आला. (मौजे येवलेवाडी संकेत क्र ३११३६) तसेच फेरफार एक नोदीप्रमाणे स.नं.६७ अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांनी पीएमआरडीए युनिट ९ सेक्टर-डी (पार्ट)ई@ एफ पीएमआरडीए पुणे या नंकाशावर संर्वे नं.६७ हा येवलेवाडीमध्ये दाखविला आहे.
येवलेवाडी फेरफार-१ प्रमाणे पुणे महापालिकेच्या नंकाशावर स.नं.६७ येवलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतमध्ये दाखविला आहे. मात्र, सातबारा नोंद कोंढवा बुद्रुकमध्ये दाखविल्याचे दिसत आहे. स.नं.१४, स.नं.३९, स.नं.४०, स.नं.४१ लगत असून, सर्वच सर्वे नं.ची येवलेवाडी फेरफार-१प्रमाणे येवलेवाडी सातबारा सदरी नोंद झाली आहे. परंतु शासनाच्या नजरचुकीने सर्वे नं 67 याची नोद येवलेवाडी फेरफार एक प्रमाणे नोंद येवलेवाडीमध्ये न होता ती सातबारा नोंद कोंढवा ब्रु मध्ये दाखविल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संर्वे नं मध्यील शेतकरी बांधवांना सर्व ठिकाणी त्रास संहण करावा लागत आहे. प्रशासनाने सत्यता तपासून स.नं.67 ची नोद ही येवलेवाडी सातबारा दप्तरी करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, असे त्यांनी सांगितले.
"हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुकमधून १९८५ साली येवलेवाडी ग्रामपंचायत करण्यात आली. त्यावेळी स.नं.६७ अनावधानाने कोंढवा बुद्रुकमध्येच राहिला. त्यामुळे येवलेवाडीतील या गटातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने त्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे."
-गणपत दगडे, माजी सरपंच, पिसोळी
"सं नं ६७ मध्ये ३९ शेतकरी असून, सातबाराची नोंद कोंढवा ब्रुद्रुकमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने योग्य तो निर्णय घेऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यावा."
-आझाद हादीमोहमद सोमजी, शेतकरी- येवलेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.