"साम वाहिनी'वरून अष्टविनायक दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

पुणे - गणेशोत्सवात दर्शकांना घरबसल्या अष्टविनायकाची यात्रा घडवणारी "अष्टविनायक यात्रा‘ ही आठ भागांची मालिका "साम वाहिनी‘ यंदाही प्रसारित होणार आहे. अभिनेते अमित कल्याणकर आणि वृषाली पाटील यांच्या भूमिका असलेल्या या मालिकेतून विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या निरूपणाचा आनंदही दर्शकांना मिळणार आहे. सोमवार (ता. 5) पासून सुरू झालेली ही मालिका दररोज संध्याकाळी 6 वाजता दर्शकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक भागाचे पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पाहायला मिळेल. राजर्षी शाहू बॅंक, पुणे, पितांबरी प्रॉडक्‍ट प्रा. लि. आणि चितळे उद्योग समूह या मालिकेचे प्रायोजक आहेत.

Web Title: "Saam' chanel Ashtavinayak Darshan