#saathchal वारकऱ्यांसाठी शहरात शौचालयांची व्यवस्था 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

पुणे : आषाढी वारीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेने शहरांत 530 शौचालये उभी केली आहे. सात ठिकाणी फिरती शौचालये ठेवली आहे. 

पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी राहणार आहे. या काळात वारकऱ्यांना सार्वजनिक स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. दिंड्यांच्या मुक्कामाच्या भागात सार्वजनिक आणि खासगी स्वरूपाची स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पुरुषांकरिता 271 आणि महिलांसाठी 259 स्वच्छतागृहांची व्यवस्था महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या भागात केली आहे. 

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वांत जास्त 178 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचप्रमाणे कात्रज, गुजरवस्ती, बिबवेवाडी, खामकर गार्डन, शिवाजीनगर पोलिस वसाहत, नऱ्हे आंबेगाव येथील थोरवे शाळा, खराडी येथील आपले घर अर्बन निर्माण सोसायटी, विश्रांतवाडी येथील कस्तुरबा सोसायटी, वडगाव शेरी येथील शिवराज शाळेजवळ फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. 

Web Title: #saathchal Arrangement of toilets in cities for the Warakaris