#SaathChal ‘साथ चल’साठी रोटरीचाही निर्धार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी -  ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या ‘साथ चल’ या उपक्रमात सर्व सभासदांसह सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प निगडी रोटरी क्‍लबने शुक्रवारी (ता. २९) केला.

संभाजीनगर येथील रोटरी क्‍लब सभागृहात वार्षिक सभेचे आयोजन केले होते. या वेळी अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, सचिव डॉ. प्रवीण घाणेगावकर आणि उपाध्यक्ष विजय काळभोर व्यासपीठावर उपस्थित होते. बहुसंख्य उद्योजक, डॉक्‍टर्स, वकील, सीए या क्‍लबचे सदस्य आहेत. सर्व मान्यवर सभासद या वेळी उपस्थित होते. राष्ट्रगीतानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. या वेळी रोटरी 

क्‍लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती पदाधिकाऱ्यांनी सभासदांना दिली. 

क्‍लब अध्यक्षांच्या संमतीनंतर ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. शहरातून संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करताना शक्‍य तिथे रोटरीच्या सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सभासदांनी उत्स्फूर्तपणे या संकल्पनेला दाद दिली आणि सहभागी होण्याची ग्वाही दिली. 

क्‍लबच्या वतीने दिंडीप्रमुखांना प्रथमोपचार पेटी वाटप करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: #SaathChal Nigdi Rotary Club