esakal | #SaathChal डोर्लेवाडीत पालख्यांचे स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

डोर्लेवाडी (ता. बारामती) - संतराज महाराज पालखीचे स्वागत करताना ग्रामस्थ.

#SaathChal डोर्लेवाडीत पालख्यांचे स्वागत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

डोर्लेवाडी - वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत गोरोबा कुंभार, योगिराज संतराज महाराज, संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्याचे डोर्लेवाडी (ता. बारामती) परिसरात स्वागत करण्यात आले.

शनिवारी संत गोरोबा कुंभार पालखी सोहळ्याचा रात्री येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात पालखीचा मुक्काम होता. योगिराज संतराज महाराज पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आटोपून रविवारी सकाळी लवकर मार्गस्थ झाला. वाटेत समर्थनगर, विश्वासनगर, गुणवडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. डोर्लेवाडीच्या वेशीवर पालखी आल्यानंतर सांप्रदायिक भजनी मंडळ व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.

त्यानंतर पालखी खांद्यावरून गावात आणण्यात आली. डोर्लेवाडी सोसायटीच्या आवारात पालखी आल्यानंतर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. पालखी व सोहळा प्रमुखांचे सरपंच बाळासाहेब सलवदे, उपसरपंच सुनीता खोत, ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे यांनी स्वागत केले. दुपारी पालखी झारगडवाडी (ता. बारामती) येथे सकाळच्या न्याहारीसाठी विसावली. पाणी पुरवठा योजना परिसरात भव्य गोल रिंगण झाले.  सोनगाव ग्रामपंचायतीच्या वतीनेही पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा सायंकाळी तावशी (ता. इंदापूर) येथे मुक्कामासाठी विसावला. दरम्यान दुपारी संत निळोबाराय पालखी सोहळ्याचेही या मार्गाने आगमन झाले.

loading image