#SaathChal आळंदीतील वाहतुकीत आजपासून बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

आळंदी - आषाढी वारीत मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड तसेच मालवाहू वाहनांना मंगळवारपासून (ता. ३) आळंदी शहरातून प्रवेश बंद आहे. पुणे-नगर महामार्गावरून लोणीकंदवरून मरकळला औद्योगिक वाहने वळविली जातील. महाद्वार रस्ता, प्रदक्षिणा रस्त्यावर तसेच पालिका चौकात वाहने उभी करण्यास बंदी असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली.

आळंदी - आषाढी वारीत मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड तसेच मालवाहू वाहनांना मंगळवारपासून (ता. ३) आळंदी शहरातून प्रवेश बंद आहे. पुणे-नगर महामार्गावरून लोणीकंदवरून मरकळला औद्योगिक वाहने वळविली जातील. महाद्वार रस्ता, प्रदक्षिणा रस्त्यावर तसेच पालिका चौकात वाहने उभी करण्यास बंदी असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली.

आळंदीत होणाऱ्या आषाढी वारीच्या बंदोबस्ताबाबत माहिती देताना दराडे यांनी सांगितले, की ‘‘वारी काळात मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड वाहनांना आळंदी शहरातून मंगळवारपासून प्रवेश बंदी आहे. अतिक्रमणे दूर करण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक राहील. छोट्या वाहनांसाठी एकेरी पद्धतीने वाहतूक चालू करण्यात येणार आहे. धर्मशाळांकडे येणारी वारकऱ्यांची वाहने धर्मशाळांच्या आत अथवा सार्वजनिक वाहनतळाच्या जागेत उभी करावी. महाद्वारातील रस्त्यांवरही वाहनांना मंगळवारपासून बंदी राहील.

पोलिसांचा बंदोबस्त बुधवारी (ता. ४) जुलैला दाखल होईल. दुसऱ्या दिवशी (ता. ७) पालखी पुण्याकडे मार्गस्थ होत असते. या वेळी पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि वाहने एकाचवेळी चालू शकत नाही. या वेळी दिंडीतील वाहने आळंदी, मरकळ, लोणीकंद, वाघोली, येरवडा, शास्त्रीनगर, गोल्फ क्‍लब, दत्तनगर, फुलेनगरमार्गे दुपारच्या पालखीच्या विसाव्याला विश्रांतवाडी येथे पोचणार आहे. दिंडीतील काही वाहने माउलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होण्याआधी पहाटे दोनपासून पुणे-आळंदी रोडने सोडण्यात येतील. शनिवारी (ता. ७) जुलैला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होत असताना भोसरी, पिंपरी भागांतून आळंदीला येणारी वाहने दिघी मॅक्‍झिन येथेच अडविली जाणार आहेत. मोशी देहूमार्गे येणारी वाहने आळंदीतील देहूफाटा येथे अडविली जाणार आहेत. पालखी सोहळा पुणे विश्रांतवाडीच्या पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा खुला करण्यात येणार आहे.

साध्या वेशातील पोलिस ः खैरे
दिघीचे पोलिस निरीक्षक खंडेराव खैरे म्हणाले, ‘‘दिघी पोलिसांनी १९ पोलिस निरीक्षक, ४९ पोलिस उपनिरीक्षक, ५५० पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय पालखी मार्गावर बाँब तपासणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. इंद्रायणीवरील चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Alandi transport changed