#SaathChal ‘साथ-साथ’ चालत घेऊ शपथ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पिंपरी - विठुमाउलीचा गजर करीत निघणाऱ्या आषाढी वारीमध्ये आपल्या जन्मदात्या माऊलीचे अन्‌ कुटुंबाचे आठवण करणारी ‘साथ चल’ ही अनोखी दिंडी सहभागी होणार आहे. या दिंडीत फक्त एक ते दीड किलोमीटरचे दहा टप्पे असून त्यापैकी कोणत्याही टप्प्यात सहभागी होऊन आपल्या माता-पित्यांप्रतीचा कृतज्ञता भाव पुणेकरांना व्यक्त करता येईल, तसेच कुटुंबस्वास्थ्याची शपथही घेता येईल.

आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा अनुक्रमे पाच आणि सहा जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तो सोहळा पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात येणार आहे. सोहळ्यातील शेवटच्या दिंडीनंतर ‘साथ चल’ उपक्रमातील दिंडी असेल. ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रम आयोजित केला आहे. त्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दिंडीच्या वाटचालीचे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात टप्पे केलेले आहेत. यातील कुठल्याही टप्प्यात नागरिकांना सहभागी होता येणार आहे.

प्रत्येक टप्प्यावर छोटा मंडप असेल. प्रत्येक टप्प्यातील वाटचालीनंतर मंडपात थांबून ‘आई-वडिलांचा सांभाळ’ करण्याबाबत शपथ दिली जाईल. त्यानंतर पुढील टप्पा सुरू होईल. हा उपक्रम सहा व सात जुलै रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आणि नऊ जुलै रोजी पुण्यात राबविण्यात येणार आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Palkhi Timetable 2018