#SaathChal वारी विठुरायाची अन् माता-पित्याच्या संगोपनाची

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पुणे - आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची ही संकल्पना उत्कृष्ट असून, ‘साथ चल’ या ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्सच्या वतीने यंदा आषाढी वारीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास त्वष्टा कासार आणि सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचा उत्स्फूर्त सहभाग असेल, असे आश्‍वासन या समाजातील नागरिकांनी शनिवारी सकाळ कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.  

बैठकीला त्वष्टा कासार समाजातर्फे भालचंद्र वडके, लक्ष्मण निजामपूरकर, रामचंद्र निजामपूरकर, किशोर करडे, अजय तांबट, सुधीर करडे आणि सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजातर्फे अंजली कासार व स्नेहल पोफळे यांनी सहभाग घेतला. त्वष्टा कासार समाज संस्थेचे माजी अध्यक्ष भालचंद्र वडके म्हणाले,‘‘आई-वडिलांप्रती आदरभाव, कृत्रज्ञता हा विषय तरुण पिढीपर्यंत पोचणे सध्याची गरज आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे हे योग्य नाही. या कार्यात आमचे सहकार्य लाभेल.’’ 

कालिका को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या उपाध्यक्षा अंजली कासार म्हणाल्या, ‘‘आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव खरंतर प्रत्येकाने ठेवायला हवी. आपल्या आयुष्यात त्यांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांनीच तर आपल्याला संस्कार दिले आहेत. म्हणूनच त्यांच्याविषयीची जाणीव म्हणून वारीत ‘साथ चल’ या उपक्रमात निश्‍चित सहभागी व्हायला हवे.’’ 

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Palkhi Timetable 2018 Finolex Cable