#SaathChal बारामतीत पालखी सोहळ्याने लोटली भाविकांची गर्दी

#SaathChal बारामतीत पालखी सोहळ्याने लोटली भाविकांची गर्दी

बारामती शहर  - जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामती नगरीत भक्तीमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती. बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्यासह अनेक नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मंडळांचे प्रमुख यांनी पालखीचे प्रथेनुसार स्वागत केले.
 
शारदा प्रांगणात पालखी सोहळ्याचा मुक्काम असून, प्रांगणात पंधरा हजार स्क्वेअर फूटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आज भाविकांनी पालखीच्या आगमनानंतर दर्शनासाठी एकच गर्दी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
 
विविध मंडळांच्या वतीने वारक-यांची सेवा केली गेली. बारामती नगरपालिकेच्या वतीने प्रत्येक वीणेकऱ्यांचा पुष्पहार अर्पण करुन सत्कार करण्यात आला. बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने बिस्कीट वाटप करण्यात आले. अध्यक्ष विजय सणस, उपाध्यक्ष फय्याज शेख, सचिव अप्पा घुमटकर, खजिनदार बापू गायकवाड, प्रकाश शिंदे, सहखजिनदार शाम राऊत यांच्यासह विक्रेते उपस्थित होते. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पालखी सोहळ्यातील दोन हजार वारक-यांना कापडी पिशवी प्रदान करण्यात आली. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व सहकारी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या शिवाय वारकऱ्यांची मोफत नेत्रतपासणी डॉ. सचिन कोकणे व त्यांच्या सहका-यांनी फोरमच्या वतीने केली.

पांढरीच्या महादेवाच्या मंदिरानजिक नगरसेवक अशोककाका देशमुख यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध शाळा व महाविद्यालयांच्या वतीनेही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बारामती तालुका मंडप मालक असोसिएशन, महात्मा फुले तरुण मंडळ, अमर धुमाळ मित्र मंडळ, बारामती सहकारी बँक, सिध्दी गणेश ट्रस्ट, शहर पोलिस स्टेशन, उध्दवराव इंगुले प्रतिष्ठान, बारामती मेडीकल फाऊंडेशन, श्रीनिवास पतसंस्था, मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशन, जनकल्याण समिती, अ.भा.वि.प., काळे बंधू, महावीर पथ मित्रमंडळ, बारामती होमिओपॅथिक असोसिएशन, उपप्रादेशिक परिवहन विभाग, मराठी पत्रकार संघ, अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ, मोता परिवार, तुळजाभवानी मंडळ यांच्यासह अनेक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा केली गेली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com