#SaathChal तुकोबांच्या रथाला हवशा-नवशाची जोडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्‍यातील माण गावाला तीन वर्षांनंतर तुकाराम महाराज पालखीचे सारथ्य करण्याचा मान मिळाला. त्यामुळे गावातील तरुण पालखी रथाभोवती पांढरा सलवार-कुर्ता आणि गांधी टोपी घालून वारीची वाट चालत आहेत.

रथाच्या खिलारी बैलांची नावे ‘हवशा’ आणि ‘नवशा’ अशी आहेत. पालखी रथाच्या बैलजोडीचा मान यंदा गावाला मिळावा, यासाठी गावकऱ्यांनी नवस केला होता. त्याला यश मिळाले. तो पूर्ण झाला म्हणून रथाला जोडण्यात आलेल्या एका बैलाचे नाव ‘नवशा’ ठेवण्यात आले; तर पालखी रथाचे सारथ्य करण्याची हौस गावकऱ्यांमध्ये होती. म्हणून दुसऱ्या बैलांचे नाव ‘हवशा’ असे ठेवण्यात आल्याचे गावकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. हवशा-नवशाच्या पांढऱ्या शुभ्र बैलजोडीला गावकरी मोठ्या आवडीने सजवत आहेत. दोन्ही बैलांच्या अंगावर शुभचिन्ह असलेले स्वस्तिक रेखाटण्यात आले असून, शिंगांना गोंडे बांधण्यात आले आहेत. ही बैलजोड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Ox Sant tukaram maharaj rath