#SaathChal आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - ‘भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी’ व ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांनी आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील.  

पुणे - ‘भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी’ व ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांनी आषाढी वारीवर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. हौशी, नवोदित व अनुभवी छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली असून, विजेत्यांना एकूण २५ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येतील.  

‘इंद्रायणी ते चंद्रभागा -चित्रप्रवास’ या वारीदरम्यानच्या काळातील स्पर्धेत वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांशी संबंधित छायाचित्रांचा समावेश असावा. मोबाईल अथवा अन्य सर्व प्रकारच्या कॅमेरामधून छायाचित्रे काढलेली असावीत. प्रवेशिकांमध्ये वारकऱ्यांच्या भावमुद्रा, वारीतील प्रसंग, मुक्काम काळातील वातावरण, वारकऱ्यांचे खेळ, अश्‍व व मेंढ्यांचे रिंगण अशा छायाचित्रांचा समावेश असू शकतो. वारीतील वेगळेपण टिपण्याचा प्रयत्न केल्यास स्पर्धकांनी प्रवेशिका पाठवताना आवर्जून तसा उल्लेख करावा. स्पर्धेसाठी पोज्ड पोट्रेट फोटोग्राफी असा स्वतंत्र विभागही असेल. 

प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार रुपयांची तीन पारितोषिके व प्रत्येकी एक हजार रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. 

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी हे या छायाचित्र स्पर्धेचे प्रायोजक असून, स्पर्धेसाठी संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. संस्थेत अत्याधुनिक तंत्र, तसेच यंत्रसामग्रीद्वारे छायाचित्रण पदवीविषयक प्रशिक्षण देण्यात येते. यंदा तीन-तीन वर्षांचे बी.ए.ऑनर्स, व्यावसायिक फोटोग्राफी व फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी छायाचित्रण पदवी, असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

स्पर्धेचे नियम 
 यंदाच्या (२०१८) आषाढी वारीत घेतलेल्या छायाचित्रांचा समावेश असावा.
 स्पर्धकांनी १२ बाय ८ आकारातील छायाचित्रे wariphoto@esakal.com या ई-मेलवर पाठवावीत.
 प्रत्येक स्पर्धक २५ ते ३० छायाचित्रे पाठवू शकतील.
 प्रत्येक छायाचित्रासोबत स्पर्धकांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, तारीख, छायाचित्र काढलेले ठिकाण व प्रसंगाचे नाव ही माहिती फोटोच्या एका कोपऱ्यात (मूळ छायाचित्राला बाधा न पोचू देता) वॉटरमार्क करून पाठवायची आहेत. मूळ छायाचित्रांवर कोणतेही संगणकीय कृत्रिम बदल केलेले नसावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क - राहुल गरड - ८६०५०१७३६६

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Ashadhi Wari Drawing Competition