#SaathChal पालखी सोहळ्यात स्वच्छता अभियान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात "परिवर्तन - अन्नसुरक्षा व स्वच्छता अभियान' राबविण्यात येत आहे. राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग, कोकाकोला इंडिया आणि नेसले इंडिया यांच्यातर्फे सुरू केलेल्या या यानाची सुरवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आली.

पालखी मार्गावरील फिरते विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपेय स्टॉल या माध्यमातून अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांना अन्नसुरक्षेचे धडे या अभियानातून देण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही पालखी मार्गांवर बस ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेचे धडे देण्याबरोबरच बापट यांच्या हस्ते व्यावसायिकांना हायजिन किटचे वाटप करण्यात आले.

या वेळी कोकाकोला कंपनीचे संदीप बोराळकर, नेसले कंपनीचे संदीप सावंत आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई उपस्थित होते.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Cleaning Campaign