Pune News : साधू वासवानी उड्डाणपूल शनिवारपासून वाहतुकीसाठी बंद

साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक झाल्याने हा पूल शनिवारपासून (ता. ६) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे.
Sadhu Vaswani Flyover
Sadhu Vaswani Flyoversakal

पुणे - साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक झाल्याने हा पूल शनिवारपासून (ता. ६) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहनांसाठी पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दरम्यान, हा उड्डाणपूल पाडून टाकून तेथे नव्याने पूल बांधला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे ५० वर्षापूर्वी साधू वासवानी उड्डाणपुलाचे बांधकाम केले आहे. या उड्डाणपुलाचे आयुर्मान संपत आल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे महापालिकेने या उड्डाणपुलावरील अवजड वाहतूक बंद केली होती. तसेच गेले वर्षभर डागडुजी करण्याचा प्रयत्न केला.

पण त्यानंतरही उड्डाणपूल कमकुवतच राहत असल्याने त्याचे स्लॅबचे सिमेंट पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे ६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर पुढील दहा ते पंधरा दिवस वाहतुकीची पर्याय व्यवस्था करण्यात येणार आहे.

हा उड्डाणपूल बंद झाल्याने नगर रस्ता, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, विधान भवन, मोरवाडा या परिसरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे. काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरु केली जाणार आहे. त्याबाबतचे नियोजन वाहतूक पोलिस करत आहेत, असे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com