संमेलनासाठी पुन्हा पुण्यातच हालचाली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पुणे - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे परिसरात व्हावे, यासाठी पुण्यातील एका संस्थेने आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. संमेलनाचे निमंत्रणही त्यांनी नुकतेच महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाकडे दिले आहे; पण "त्याच त्या भागात संमेलन नको' अशी भूमिका घेणारे महामंडळ या निमंत्रणाचा कसा विचार करणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. 

दरवर्षी साहित्य संमेलनात आगामी संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणांची घोषणा केली जाते. किमान सात ते आठ निमंत्रणे संमेलनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत येतात; पण यंदा डोंबिवली येथे झालेल्या संमेलनापर्यंत आगामी संमेलनासाठी एकही निमंत्रण आलेले नव्हते; मात्र आता महामंडळाकडे निमंत्रण येण्यास सुरवात झाली आहे. पहिले निमंत्रण पुण्यातूनच पाठवण्यात आले आहे. त्यामुळे संमेलनासाठी आणखी कोण-कोण पुढे येणार, याकडे महामंडळाचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून सलग पुणे आणि मुंबई परिसरात संमेलने होत आहेत. त्यामुळे येथील साहित्य परिषदांनी नाराजी व्यक्त करत संमेलनाची खरी गरज पुण्या-मुंबईऐवजी मराठवाडा-विदर्भात आहे, तेथे संमेलन घ्या, असे म्हणणे महामंडळापुढे मांडले आहे. बऱ्याच लेखकांनीही हीच भूमिका महामंडळाकडे व्यक्त केली आहे. याच दरम्यान, पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने आगामी संमेलनाचे निमंत्रण पाठवले आहे. आम्हाला शिरूरमध्ये संमेलन घ्यायचे आहे, असे लक्ष्मीकांत खाबीया यांनी "सकाळ'ला सांगितले. 

अंतिम निर्णय महामंडळाचा 
संमेलनासाठी पुण्यातूनच वारंवार निमंत्रण येऊ लागली, तर आम्हाला साहित्य महामंडळाच्या घटनेत बदल करावा लागेल, अशी कोटी करत महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, ""संमेलनासाठी 15 मेपर्यंत निमंत्रणे पाठवता येऊ शकतील. यानंतर किती निमंत्रणे आली हे आम्ही जाहीर करू. त्यापैकी कुठले निमंत्रण स्वीकारायचे, याचा अंतिम निर्णय महामंडळाच्या बैठकीत होईल.'' 

Web Title: Sahitya sammelan meeting in pune