

Sahyadri Hospital Clarifies
ESakal
पुणे शहरातील हडपसर परिसरात बुधवारी उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यानंतर संतापाच्या भरात सह्याद्री रुग्णालयाच्या काचेच्या मुख्य प्रवेशद्वाराची तोडफोड केली आहे. पुण्यातील हडपसर भागातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड केल्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.