ऐतिहासिक शस्त्रागार पाहण्यासाठी गर्दी...

exhibition at balgandharva in pune
exhibition at balgandharva in pune

पुणे : सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संस्थेतर्फे व हिंदवी स्वराज्य महासंघाच्या सहकार्याने बालगंधर्व येथे मराठ्यांचे शस्त्रागार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाला चार लाखांहून अधिक जणांनी भेट देत ऐतिहासिक वस्तूंची माहिती घेतली.

बालगंधर्व येथे 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक सरदार घराण्यांनी आपली शस्त्रे, वस्त्रे व अस्त्रे प्रदर्शित केली होती. यामध्ये दाभाडे, गरुड, पवार, शिरोळे, गोळे, कंक, नाईक निंबाळकर, जाधवराव, गंधे, विंचूरकर, बावडेकर, ढमाले, राजेशिर्के, मोहिते, पायगुडे, इत्यादी घराण्यांनी सहभाग घेतला. प्रदर्शनाचे उद्‌घाटन पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, भूजल विकास यंत्रणाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर व फत्तेशिकस्त चित्रपटाच्या कलाकारांच्या हस्ते करण्यात आले होते.

सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे म्हणाले, "खरंतर हे प्रदर्शन नसून, शस्त्रांचे दर्शन होते. प्रथमच अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांबरोबरच, महाराष्ट्रासह परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली.' श्रीमंत साबूसिंग पवार यांचे वंशज हिमांशुराजे पवार व दिग्विजयसिंह पवार म्हणाले, "प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांना रांगा लावल्या होत्या. ऐतिहासिक वस्तू पाहून अनेकजण भारावून जात होते. परंतु, वेळेअभावी व मोठी गर्दी झाल्यामुळे अनेकांना प्रदर्शन पाहता आले नाही. भविष्यात असे प्रदर्शन भरवणार आहोत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com