'पाठ्यपुस्तकात साईबाबांविषयी धडा समाविष्ट करा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे : धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांविषयी शालेय पाठ्यपुस्तकात धडा समाविष्ट करण्याची मागणी, श्री साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी सरकारकडे केली आहे.

नेलगे यांनी नुकतेच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी माजी विश्वस्त डी. एच. इनामदार, श्री शिर्डी साईबाबा संस्थानचे वसंतराव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

नेलगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की साईबाबांसाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाईसह सर्वधर्मीय समान होते. त्यांनी कायम धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. त्यामुळेच ते भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहेत. जगभरातील अनेक साधू-संतांची माहिती शालेय पुस्तकांमध्ये आलेली आहे. महासमाधी शताब्दीनिमित्त साईबाबांची माहिती असलेला धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा. 

Web Title: Saibaba topic add in textbook demanded by Subhash Nelge