चालू घडामोडींवर "सकाळ करंट अपडेट्‌स 2016' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पुणे - केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या महत्त्वपूर्ण विषयासाठीचे "सकाळ प्रकाशना'चे उपयुक्त त्रैमासिक "सकाळ करंट अपडेट्‌स-2016' (भाग 3) नुकतेच प्रकाशित झाले आहे. 

पुणे - केंद्र व राज्य लोकसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदांकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या महत्त्वपूर्ण विषयासाठीचे "सकाळ प्रकाशना'चे उपयुक्त त्रैमासिक "सकाळ करंट अपडेट्‌स-2016' (भाग 3) नुकतेच प्रकाशित झाले आहे. 

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, कृषी, क्रीडा, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींची अचूक माहिती यात देण्यात आली आहे. हे त्रैमासिक एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, वनसेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीनही टप्प्यांवर उपयुक्त आहे. "सकाळ करंट अपडेट्‌स'मधील विविध घटना घडामोडींच्या लेखनासाठी अधिकृत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपानुसार विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल व त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल, अशा पद्धतीने अचूक आणि अद्ययावत माहितीही यात देण्यात आली आहे. सर्वच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या सराव प्रश्‍नसंचाचा समावेश असलेल्या हे त्रैमासिक 125 किमतीचे असून, ते 110 या सवलत मूल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे त्रैमासिक महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे व "सकाळ'च्या सर्व कार्यालयांत उपलब्ध आहे. 

"सकाळ करंट अपडेट्‌स'मधील घडामोडी 
वस्तू व सेवाकर( जीएसटी) विधेयक, रिओ ऑलिंपिक स्पर्धा ः 2016, मॅगसेसे पुरस्कार, 51वा ज्ञानपीठ पुरस्कार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, भारत आणि जी-20 परिषद, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक, फेसबुक सोलार ड्रोन, भारत-अमेरिका संरक्षण करार, स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी, भारतातील गुन्हे ः 2015 अहवाल, रिमपॅक 2016,"मिस्टर वर्ल्ड 2016 इत्यादी. 

विविध स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी "सकाळ प्रकाशना'च्या "सकाळ करंट अपडेट्‌स3 या पुस्तकाचा मला खूप फायदा झाला. विविध क्षेत्रांतील चालू घडामोडींच्या अपडेट्‌स या पुस्तकात अधिक माहितीपूर्ण व विस्तृत स्वरूपात दिलेल्या असतात. मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठीही सकाळ करंट अपडेट्‌स हे उपयुक्त संदर्भपुस्तक आहे. 
समाधान रूपनार, विक्रीकर निरीक्षक 

अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क 
सकाळ पेपर्स प्रा. लि., 595, बुधवार पेठ, पुणे-2. 020-24405678 किंवा 8888849050 
सकाळ प्रकाशनाच्या स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तकांविषयी जाणून घेण्यासाठी लॉग इन करा sakalpublications.com

Web Title: Sakal Current Updates - 2016

टॅग्स