‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चा उद्या पारितोषिक वितरण समारंभ

Drawing-Competition
Drawing-Competition

पुणे - देशात सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा असा ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चा लौकिक आहे. या स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (ता. १९) पुण्यातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहामध्ये दुपारी एक ते चार या वेळेत होणार आहे. 

‘सकाळ’तर्फे १६ डिसेंबर २०१८ रोजी राज्यव्यापी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेली ३३ वर्षे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातून सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त केंद्रांवर पावणेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वसाधारण मुलांबरोबरच राज्यभरातील दिव्यांग व आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत मोठा सहभाग होता.  

या स्पर्धेच्या राज्यपातळी, विभागपातळी व केंद्रपातळीवरील विजेत्यांचा गटवार निकाल यापूर्वी टप्प्याटप्प्याने ‘सकाळ’मधून आवृत्तीनिहाय प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवडक विजेत्यांशी फोनद्वारे संपर्क साधला जात असून, निमंत्रित केले जात आहे. जागेची मर्यादा असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. 

इतर नागरिकांसाठीसुद्धा हा कार्यक्रम खुला राहील. कार्यक्रमस्थळी निवडक विजेत्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. 
या स्पर्धेचे टायटल प्रायोजक झेडएफ (इंडिया) लिमिटेड, एंटरटेन्मेंट प्रायोजक झी युवा, कॉर्पोरेट पार्टनर इंडियन ऑइल, सहप्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. व सृजन कॉलेज ऑफ डिझाइन हे होते.

सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा... 
या स्पर्धेत प्रत्यक्ष केंद्रांवर उपस्थित राहून भाग घेण्याबरोबरच ऑनलाइन आयोजित केलेल्या स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या सहभागाची सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा, अशी नोंद घेतली होती व तसे प्रमाणपत्रही ‘सकाळ’कडे प्रदान केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com