कर्तृत्वाला मिळालं सन्मानाचं कोंदण

कर्तृत्वाला मिळालं सन्मानाचं कोंदण

पुणे - व्यवसायात नवनवीन प्रयोग करून यशस्वी उद्योजक झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकीतून मदत करीत असलेल्या पुण्याच्या दक्षिण भागातील २६ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. बालेवाडी येथील ‘ऑर्किड’ हॉटेलमध्ये शुक्रवारी हा दिमाखदार  सोहळा पार पडला. 

ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक सम्राट फडणीस, सहयोगी संपादक रमेश डोईफोडे, ‘झी मराठी’वरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील अभिनेता तेजस बर्वे आणि अभिनेत्री अमृता धोंगडे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. चोरडिया यांनी पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. फडणीस यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. गायक हरीश वांगीकर आणि स्वप्नजा लेले यांनी मराठी गीते सादर करून उपस्थितांची  मने जिंकली. 

या वेळी चित्रकार सुमीत काटकर यांनी चित्रे रेखाटली. अभिनेत्री अमृता धोंगडे हिचा वाढदिवसही या वेळी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी आभार मानले.

मान्यवरांचा सन्मान..
प्रा. डॉ. संजय चोरडिया, ज्ञानेश्‍वर तापकीर, सचिन लगड, प्रवीण बढेकर, नीरज कुदळे, शशांक मेंगडे, डॉ. राजीव जगताप, रघुनाथ येमुल गुरुजी, सारंग राडकर, शांतिलाल धोका, वैशाली गलांडे, कांतिलाल ओसवाल, राजेंद्र बांदल, अतुल कारले, सुरेश गाटे, डॉ. लक्ष्मीकांत गजेश्‍वर, कालिदास मोरे, रंजन कोळंबे, निकिता गिरमकर, आशिष दुगड, स्वप्नील अमराळे, डॉ. सागर बालवडकर, डॉ. भालचंद्र काळमेघ, संजय हरपळे, अजय मुथा, सुरेश हुले. 

समाजामध्ये खूप क्षमता आहे. दडलेल्या हिऱ्यांना संधी देण्याचे काम ‘सकाळ’ करीत आहे. त्यामुळेच ‘गुगल’ आणि ‘टाटा ट्रस्ट’ने आम्हाला खेड्यातील महिलांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी दिली. आमच्या टीमने सहा महिन्यांत ४ लाख ७५ हजार महिलांना इंटरनेटचे प्रशिक्षण दिले. खेड्यातील महिलांना संधी देण्याची गरज आहे. ‘सकाळ’ त्यात खारीचा वाटा उचलत आहे. साधने, संशोधन आणि पैशांच्या बाबतीत आपला शेतकरी मागे आहे. त्यांना आम्ही प्रशिक्षण देत आहोत. पुरस्कार मिळालेले सर्व जण इतरांसाठी प्रेरणास्थान आहेत. कष्ट केल्यानंतर त्याची दखल घेतली जाते, हे या पुरस्कारातून स्पष्ट होते. 
- प्रतापराव पवार,  अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह  

कामाची दखल घेतली गेली तर व्यक्ती अजून जोमाने काम करतो. पुरस्कारार्थी करीत असलेल्या कामाबद्दल ‘सकाळ’ने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. पुरस्कारार्थींबरोबर त्यांच्या कुटुंबाचा सन्मान केला ही आनंदाची गोष्ट आहे. ‘सकाळ’ची समाजाशी नाळ जोडली गेली आहे. समाजमनाचा विचार करून त्यांचे प्रश्‍न मांडण्याचे काम ‘सकाळ’ करीत आहे. समाजाला मार्गदर्शन करीत गरज पडल्यास ‘सकाळ’ त्यांच्या पाठीशी उभा राहत आहे. माझ्यावर आलेल्या प्रसंगावेळीही ‘सकाळ’ने माझ्या मागे उभे राहून केवळ सत्य बाजू मांडली.  
- डॉ. तात्याराव लहाने,  ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ 

पुरस्कारार्थींचे मनापासून अभिनंदन. गौरव झालेल्या व्यक्ती इतरांना प्रेरणा देत असून, तुम्ही आणखी मोठे काम करावे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्यावर खूप प्रेम करीत आहे. हे प्रेम त्यांनी असेच ठेवावे, अशी आशा आहे. 
- तेजस बर्वे आणि अमृता धोंगडे,  ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिका 

डॉ. लहाने यांनी दिल्या ‘हेल्थ टिप्स’
  हॉटेलमधील जेवण टाळा 
  फास्ट फूड कमी प्रमाणात खावे
  भाजी भाकरीच खा
  नियमित व्यायाम करा
  आठवड्यातून एकदा पपई, गाजर, शेवग्याच्या शेंगा खा  
  दिवसातून दोनदा डोळे धुवा
  सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोबाईल देऊ नका 
  दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा, त्यामुळे चांगल्याप्रकारे ऑक्‍सिजन मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com