पाच दिवस करा मनसोक्त खरेदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - पावसाळ्यात फर्निचरपासून किचन गॅजेट्‌सपर्यंत वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा, यासाठी ‘सकाळ’ने पाच दिवसांचा ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो’ आयोजित केला आहे. बुधवारपासून (ता. २२) सुरू होणाऱ्या या एक्‍स्पोमध्ये शंभरहून अधिक स्टॉलवर कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हव्या असलेल्या ‘ए टू झेड’ वस्तू उपलब्ध असतील.

खरेदी महोत्सवाला भेट देणाऱ्या ग्राहकांना आकर्षक ऑफर, एक्‍स्चेंज ऑफर व लाइव्ह डेमोसह वस्तूंच्या किमतींवर मोठ्या सवलतीही मिळणार आहेत. शिवाय थेट उत्पादक आणि होलसेल विक्रेत्यांकडून खरेदीची संधी असल्याने दर्जा आणि किमतीची योग्य सांगड घालणे पुणेकर ग्राहकांना शक्‍य होणार आहे. यात गृहोपयोगी वस्तू तसेच गॅस शेगड्यांपासून चिमणीपर्यंत खरेदीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. 

होम अप्लायन्सेसची मोठी व्हरायटी, फर्निचर आणि इंटेरियर डेकॉर, फूड प्रॉडक्‍ट्‌स यांसारख्या असंख्य प्रकारच्या वस्तूंसह खरेदीदारांना आकर्षित करणारे डिझायनर आणि कलात्मक फर्निचरही प्रदर्शनात उपलब्ध असतील. नावीन्यपूर्ण उत्पादने, भरघोस सवलती आणि वैविध्यपूर्ण वस्तूंची मनसोक्त खरेदीही करता येईल. 

नावीन्य, कलाकुसर आणि रंगसंगतीचा अनोखा मिलाफ असणाऱ्या फर्निचरमध्ये डिझायनर सोफा सेट, मॉड्यूलर किचन, डायनिंग सेट्‌स, बेडरूम पॅकेजेस, वॉर्डरोब्ज, ड्रेसिंगटेबलही ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. या एक्‍स्पोमध्ये गृहोपयोगी वस्तूंबरोबरच रोजच्या वापरातील अनेक खाद्यपदार्थही एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो २०१८
 कुठे : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
 कधी : बुधवार (ता. २२) ते रविवार (ता. २६) 
 केव्हा : सकाळी ११ ते रात्री ९ 
 सुविधा ः प्रवेश विनामूल्य

Web Title: Sakal Furniture and Kitche Expro 2018