फर्निचर, किचन एक्‍स्पोचा आज अखेरचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे - गृहसजावटीचे साहित्य, किचन फर्निचरसोबत कपडे, विविध विद्युत उपकरणे अशा गृहोपयोगी वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या पुणेकरांना खरेदीसाठी ‘सकाळ फर्निचर ॲण्ड किचन एक्‍स्पो २०१८’मध्ये आज अखेरची संधी आहे. 

पुणे - गृहसजावटीचे साहित्य, किचन फर्निचरसोबत कपडे, विविध विद्युत उपकरणे अशा गृहोपयोगी वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या पुणेकरांना खरेदीसाठी ‘सकाळ फर्निचर ॲण्ड किचन एक्‍स्पो २०१८’मध्ये आज अखेरची संधी आहे. 

फर्निचरपासून ते गॅजेट्‌सपर्यंत... गृहसजावटीच्या वस्तूंपासून खाद्यपदार्थांपर्यंत विविध वस्तू एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध झाल्या आहेत. ‘लाइव्ह डेमो’सह एक्‍स्चेंज ऑफर्स आणि विविध सवलतींचा लाभ ग्राहकांना घेता आला. या एक्‍स्पोमध्ये सागवानी लाकूड ते लोखंडापासून तयार केलेले फर्निचर खरेदी करता येईल. झोपाळा, डायनिंग सेट्‌स, सोफा कम बेड, बेडरूम सेट, दिवाण सेट, मिनी सीटिंग सेट, सोफा सेट्‌स, वॉडरोब्ज, अँटिक फर्निचर असे विविध प्रकार येथे पाहायला मिळतील. सोफा सेटपासून बेडरूम सेटपर्यंतचे प्रकार सागवानी लाकडापासून तयार केले आहेत. फोल्डिंग सोफा विथ बेड, मॅट्रेसेस, बीन बॅग्ज, ऑफिस खुर्ची असे विविध प्रकारही खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

घराला नवे रूप देण्यासाठी डिझायनर फर्निचरचा समावेश केला आहे. त्यात आकर्षक पडदे, चादरी, कुशन्स, कार्पेट्‌सही आहेत. शंभरहून अधिक स्टॉल्सद्वारे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. खवय्यांसाठी खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत. हा एक्‍स्पो रविवारपर्यंत (ता. २६) खुला आहे.

आज अखेरचा दिवस
    कालावधी - रविवारपर्यंत (ता. २६) 
    वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ 
    स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
    सुविधा - प्रवेश विनामूल्य

Web Title: Sakal Furniture and Kitchen Expo