सुई ते मोटारीपर्यंत खरेदीची संधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

गणरायाच्या आगमनाआधी तुम्हाला सुईपासून मोटरही खरेदी करायची असेल तर ‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो’ला नक्की भेट द्या. दीडशेहून अधिक दालनांमध्ये फर्निचर, फर्निशिंग, सजावटीच्या वस्तूंपासून विविध घरगुती उपकरणे, किचन गॅझेट्‌ससह अनेक आकर्षक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

पुणे - गणरायाच्या आगमनाआधी तुम्हाला सुईपासून मोटरही खरेदी करायची असेल तर ‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो’ला नक्की भेट द्या. दीडशेहून अधिक दालनांमध्ये फर्निचर, फर्निशिंग, सजावटीच्या वस्तूंपासून विविध घरगुती उपकरणे, किचन गॅझेट्‌ससह अनेक आकर्षक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो’ला बुधवारपासून (ता.१४) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी गर्दी केली. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये पाच हजारांहून अधिक उत्पादने असून दीडशेहून अधिक स्टॉल्स आहेत. फर्निचर आणि किचन प्रॉडक्‍ट्‌सबरोबर मोटारीचाही स्टॉल आहे. होम अप्लायन्सेस, अँन्टिक फर्निचर, वूडन फर्निचर, इंटेरिअर डेकोरेशनची उत्पादने, आर्टिफिशिअल फ्लॉवर्स, पिकनिक टेबल, मॉड्यूलर किचन गॅस शेगड्या, चिमणीज, फूड प्रॉडक्‍ट्‌स स्टॉल्स आहेत. आकर्षक ऑफर्स, फ्री गिफ्ट आणि डिस्काउंटही मिळेल.

‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो’ हा चांगला उपक्रम आहे. सर्व वस्तू एका छताखाली मिळतात. किमतीत सूटही मिळते. माझा अनुभव चांगला आहे. 
- तृप्ती टिंबे, ग्राहक

प्रदर्शनाला लोकांचा चांगला प्रतिसाद असतो. मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री होते. दरवर्षी आमची पाच ते सात लाखांची उलाढाल होते. तसेच ग्राहकांची एक ते तीन हजार रुपयांपर्यंत बचत होते.
- भुजंग बरबडे, विक्रेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Furniture and Kitchen Expo