Sakal Impact : पुलाचे काम तर केलेच, अपघात टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकही तैनात

निलेश बोरुडे
Friday, 1 January 2021

सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील कोंढाणा हॉटेल जवळ पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त दै. 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून अर्धवट असलेले पुलाचे काम दोनच दिवसांत पूर्ण करून घेतले आहे.

किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील कोंढाणा हॉटेल जवळ पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त दै. 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून अर्धवट असलेले पुलाचे काम दोनच दिवसांत पूर्ण करून घेतले आहे.

चार दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने तब्बल दहा फूट खोल खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला होता. रात्रभर जखमी अवस्थेत पडून असलेल्या या व्यक्तीचे प्राण काही नागरिकांनी वेळीच मदत करत दवाखान्यात पाठविल्यामुळे वाचले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगड रस्त्याचे काम सुरू असल्याने जागोजागी करण्यात आलेले खोदकाम, पुलांसाठी खोदलेले खड्डे अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेसंबंधी ठेकेदाराचा निष्काळजीपणा दै. सकाळच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी याबाबत ठेकेदाराकडून तात्काळ उपाययोजना करुन घेण्यात येतील असे 'सकाळ'शी बोलताना सांगितले होते.

धोकादायक ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात....
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक सिंहगड, पानशेत या भागात येतात. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्याने धोकादायक ठिकाणी अपघात होऊ नयेत म्हणून ठेकेदाराने सुरक्षारक्षक तैनात करुन ठेवले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal impact bridge work done security guards deployed prevent accidents