सकाळ बातमीचा परिणाम, दापोडीत उघड्या चेंबरची दुरूस्ती

रमेश मोरे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील उघडे तुटलेले धोकादायक चेंबर अखेर दुरूस्ती करून झाकणे बसविण्यात आली आहेत. याबाबत सकाळमधुन दापोडीतील नागरी सुविधा ऐरणीवर या शिर्षकाखाली सचित्र बातमी मंगळवार ता.२८ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. शेजारीच रेल्वे लाईन लगत असलेल्या या रस्त्यावर रात्री नागरीकांना धोकादायकरित्या रहदारी करावी लागत होती. 

उघड्या चेंबरच्या धोक्याबरोबरच नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. गेल्या दोन तीन महिन्यांपासुन नागरीकांना येथुन येजा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. याचबरोबर येथील पथदिवे बंद असल्याने नागरीकांना अंधारातुन ये जा करावी लागत आहे. रात्री कामावरून घरी परतणारी चाकरमानी मंडळी, महिलावर्ग यांना अंधाराचा सामना करत येथुन ये रहदारी करावी लागत आहे. 

अंधाराचा फायदा घेत या परिसरात भुरट्या चो-यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. याबाबत प्रशासनाकडे नागरीकांनी तोंडी तक्रारीही केल्या होत्या. अवजड वाहनांच्या रहदारीमुळे हे चेंबर तुटले असल्याचे स्थापत्य विभागाकडुन सांगण्यात आले होते. सकाळ बातमीनंतर तात्काळ स्थापत्य विभागाकडुन येथील तुटलेल्या उघड्या चेंबरची दुरूस्ती करण्यात आल्याने नागरीकांनी सकाळचे आभार मानले. याचबरोबर येथील पथदिव्यांचीही तात्काळ दुरूस्ती प्रशासनाकडुन करण्यात यावी अशी आशा नागरीकांनी व्यक्त केली.
 
Web Title: Sakal impact, broken open chamber repair