सकाळने मांडलेल्या वास्तवाने प्रशासनाला जाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

टाकवे बुद्रुक : मोरमारवाडी, डोंगरवाडी, हेमाडेवस्ती, सटवाईवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर आलेले दगड, वाहून आलेले मुरूम मातीचे खराळ काढण्याचे काम सबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. दगड, माती, मुरूम वाहून आल्याने गावकरी भीतीच्या सावटाखाली होते. गावकऱ्यांची व्यथा सकाळने मांडली होती. याची दखल घेत प्रशासनाने सबंधितांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार यंत्राच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला पडलेले दगड, गटारांची खोदाई करताना टाकलेली माती वाहून दुसरीकडे टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली, गावावर कोणते आपत्ती येऊ नये म्हणून गावकरी प्रार्थना करीत होते. सकाळने मांडलेल्या वास्तवाने खडबडून जागे झ

टाकवे बुद्रुक : मोरमारवाडी, डोंगरवाडी, हेमाडेवस्ती, सटवाईवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर आलेले दगड, वाहून आलेले मुरूम मातीचे खराळ काढण्याचे काम सबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. दगड, माती, मुरूम वाहून आल्याने गावकरी भीतीच्या सावटाखाली होते. गावकऱ्यांची व्यथा सकाळने मांडली होती. याची दखल घेत प्रशासनाने सबंधितांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार यंत्राच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला पडलेले दगड, गटारांची खोदाई करताना टाकलेली माती वाहून दुसरीकडे टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली, गावावर कोणते आपत्ती येऊ नये म्हणून गावकरी प्रार्थना करीत होते. सकाळने मांडलेल्या वास्तवाने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने उचललेल्या पावलांनी गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

पावसाच्या पहिल्या महिन्यात दगड, माती, मुरूम वाहून खाली येऊ लागल्याने या रस्त्याच्या पायथ्याशी असलेल्या मोरमारेवाडी करांचा जीव टांगणीला लागला आहे. गावकरी रात्रंदिवस भीतीच्या दडपणाखाली वावरत होते. "भीती माळीणीची' या मथळ्याखाली सकाळने व्यथा मांडली होती. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात काही प्रमाणात मुरूम मातीचे खराळ कोसळले होते, तत्पूर्वीच गावकऱ्यांनी भीती व्यक्त केली होती. दोन दिवसापूर्वी रस्त्यावर मोठमोठे दगड पडले, मुरूम मातीचा खराळ डोंगराच्या उतारावरून पडला आता तो उचलण्याचे काम सुरू झाले. तहसीलदार रणजित देसाई यांनी सबंधितांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले. 
 

Web Title: sakal impact on goverment in junnar taluka