जोधा अकबरचा सेट अन्‌ धमाकेदार नृत्य

कर्जत (जि. रायगड) - एनडी स्टुडिओमधील ‘शिश महल’च्या भेटीप्रंसगी ‘सकाळ ज्युनिअर लीडर’स्पर्धेचे विजेते.
कर्जत (जि. रायगड) - एनडी स्टुडिओमधील ‘शिश महल’च्या भेटीप्रंसगी ‘सकाळ ज्युनिअर लीडर’स्पर्धेचे विजेते.

पुणे - ‘जोधा अकबर’चा भव्य सेट, सीएसटी स्थानक, फ्लोरा फाउंटन, दिल्लीतील रिगल टॉकीजची प्रतिकृती, खाऊगल्ली आणि धमाकेदार नृत्य, असा मनोरंजनाचा अनोखा खजिनाच ‘सकाळ’ने ‘ज्युनिअर लीडर’साठी खुला केला... मुले त्यात हरखून गेली होती. कर्जतमधील एनडी स्टुडिओची सफर अविस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

‘सकाळ ज्युनिअर लीडर’ स्पर्धेत विजेते ठरलेल्या पुणे- मुंबईसह ठाणे, रायगड आणि पिंपरी- चिंचवडमधील विद्यार्थ्यांना ‘सकाळ’ने दिलेली ही भेट खरोखरच आगळी-वेगळी ठरली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली होती. यातील निवडक विजेत्यांना ही अनोखी भेट देण्यात आली.

त्यानिमित्ताने मुलांना बॉलिवूडच्या दुनियेतील सफर घडली आणि त्याचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला. कला-दिग्दर्शक आणि एनडी स्टुडिओचे प्रमुख नितीन देसाई यांनी या मुलांशी संवाद साधला. ‘खूप मेहनत करा, कारण यशस्वी होण्यासाठी मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. यश आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या राज्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करा. प्रत्येक काम ही तपश्‍चर्या असते, ही जाणीव ठेवा,’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी या मुलांना दिला. 

‘सकाळ’मुळे मला नितीन देसाई यांच्या कर्जत येथील स्टुडिओला भेट देण्याची संधी मिळाली. सहलीत आम्ही खूप धमाल केली. वेगवेगळ्या मालिका व चित्रपटांतील भव्य सेट्‌स प्रत्यक्षात पाहिले. मस्त पावसाळी वातावरण, नाच-गाणी व रुचकर भोजनाचाही आम्ही मनमुराद आनंद लुटला.
- प्रहर्ष ठाकर, डी. ई. एस. सेकंडरी स्कूल

कर्जत येथील स्टुडिओला भेट देण्याच्या सहलीमध्ये आम्ही खूप मज्जा केली. स्टुडिओ बघताना खूप गंमत वाटत होती. चित्रपटातील कलाकार कसे काम करतात हे जवळून पाहता आले. आमची सहल खूप छान झाल्याबद्दल मी ‘सकाळ’ची आभारी आहे. 
- मृण्मयी घनवटकर, अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल

‘सकाळ’ आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. त्यामध्ये बक्षीसपात्र विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची अनोखी व अविस्मरणीय अशी ट्रिप आयोजित केली होती. या ट्रिपमध्ये मला अभूतपूर्व ठिकाण पाहण्याचा व एक विलक्षण कलाकृती आम्हाला बघण्याची संधी मिळाली. या ठिकाणी सकाळतर्फे सर्वोत्तम आयोजन आणि आदरातिथ्य पाहायला मिळाले. सकाळच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.
- सिद्धांत प्रशांत झेंडे, शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड

‘सकाळ ज्युनिअर लीडर’ कूपन स्पर्धेत माझी निवड झाली. त्या वेळी मला खूप आनंद झाला. स्टुडिओमध्ये चित्रपटनिर्मिती कशी होते, याची माहिती मला मिळाली.
- अभिजित इंगवले, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com