सकाळ महाउत्सव : आनंदाचा दसरा, बक्षिसांची दिवाळी

घटस्थापनेपासून सुरू होत असलेल्या आगामी सणांच्या निमित्ताने खरेदी करीत तब्बल एक कोटीहून अधिक रकमेची बक्षिसे जिंकण्याची संधी यंदाच्या सणासुदीच्या हंगामात मिळणार आहे.
Sakal Mahautsav
Sakal MahautsavSakal
Summary

घटस्थापनेपासून सुरू होत असलेल्या आगामी सणांच्या निमित्ताने खरेदी करीत तब्बल एक कोटीहून अधिक रकमेची बक्षिसे जिंकण्याची संधी यंदाच्या सणासुदीच्या हंगामात मिळणार आहे.

पुणे - घटस्थापनेपासून सुरू होत असलेल्या आगामी सणांच्या निमित्ताने खरेदी करीत तब्बल एक कोटीहून अधिक रकमेची बक्षिसे जिंकण्याची संधी यंदाच्या सणासुदीच्या हंगामात मिळणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खरेदीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ‘सकाळ महाउत्सवा’चे आयोजन केले आहे. त्यात कार, आठ इलेक्ट्रिक दुचाकी, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच आणि ब्लूटूथ स्पीकर, अशी भरघोस बक्षीसे नागरिकांना जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

महाउत्सवातील विजेत्यांना एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचे चार हजार ६१९ बक्षीसे वितरित केली जाणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आपल्या आवडीच्या दुकानातून केलेल्या वस्तूंच्या खरेदीवर ही बक्षीसे मिळतील. जिल्ह्यातील आघाडीच्या स्थानिक ब्रँड्सना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारा हा एक मेगा शॉपिंग फेस्टिव्हल आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोमवारी (ता. २६) सुरू झालेला खरेदीचा हा ‘महाउत्सव’ ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. महाउत्सवात आतापर्यंत १२५ हून अधिक व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

...असे मिळणार बक्षीस

‘महाउत्सवा’त सहभागी असलेल्या विविध ब्रॅँडचे आउटलेट, दुकानांमधून ग्राहक त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करतील. ठराविक रकमेच्या वस्तूंची खरेदी केल्यानंतर दुकानात ग्राहकांना कुपन देण्यात येईल. यासाठी नियम व अटी लागू असतील. उत्सवादरम्यान दोन लकी ड्रॉ आणि एक महा बंपर ड्रॉ होणार आहे. त्यातील विजेत्यांची नावे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित केली जातील. विजेत्यांना संपर्क करून बक्षिसांचे वितरण केले जाईल.

महाउत्सवात सहभागी होणारे व्यावसायिक

बांधकाम क्षेत्र, विविध प्रकारचे सेवापुरवठादार, हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ वितरक, रिटेल, ज्वेलरी, टेलिकॉम, फर्निचर, गारमेंट्स, इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तू, सेवा, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, ऑटोमोबाईल्स आणि इतर.

बाजारपेठांमधील उलाढाल वाढणार : कोरोनामुळे गेली दोन वर्ष नागरिकांना सणवार साध्या पद्धतीने साजरे करावे लागले, त्याचा फटका व्यावसायिकांनादेखील सहन करावा लागला. आता मात्र कोरोनाचे सावट दूर झाल्याने खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने सर्वच प्रकारच्या बाजारपेठांमधील उलाढाल वाढल्याने व्यावसायिकांमध्येही उत्साह आहे. दिवाळीपर्यंत विविध सणानिमित्त ग्राहक आपल्या आवडीच्या वस्तूंच्या खरेदीचा बेत आतापासूनच आखत आहेत. खरेदीचा हा ‘महाउत्सव’ ग्राहक आणि व्यावसायिकांसाठीदेखील अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com