Sakal Misal Utsav : मिसळ उत्सव आजपासून! ‘सकाळ’तर्फे खवय्यांसाठी खास संधी

मिसळचे विविध प्रकार खवय्ये पुणेकरांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
Sakal Misal Utsav
Sakal Misal Utsavsakal

पुणे - मिसळचे विविध प्रकार खवय्ये पुणेकरांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीच्या ‘सकाळ माध्यम समूहाने’ आयोजित केलेल्या मिसळ उत्सवाला शुक्रवारी (ता. २६) प्रारंभ होत आहे. हा महोत्सव रविवारपर्यंत (ता. २८) आहे.

मिसळ उत्सवात बेडेकर मिसळ, खानदेश मिसळ, शारदानंद मिसळ, केदार मिसळ, भगरे मिसळ, नाद खुळा मिसळ, करवीर कट्टा, बावडा मिसळ आदी ब्रॅंड्‌स सहभागी होतील. तसेच परिघा फूड्स, आप्पा फिल्टर कॉफी, चुलीवरची दही मिसळ, वृंदावन आइस्क्रीम यांचाही आस्वाद नागरिकांना घेता येईल.

मिसळ उत्सवाला शुक्रवारी (ता. २६) प्रारंभ होत आहे. रविवारपर्यंत (ता. २८) हा तीन दिवसांचा ‘मिसळ उत्सव’ खाद्यप्रेमींसाठी रंगणार आहे. ‘मिसळ उत्सवा’चे उद्‍घाटन अन्न व औषध प्रशासनातील असिस्टंट कमिशनर प्रवीण उमाप यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता होईल.

कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, नाद खुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ या आणि त्याहून अधिक प्रकारच्या मिसळ या उत्सवात असतील. मिसळ पाव, कडधान्याची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे.

तसेच मिसळ हा महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे भुकेच्या वेळी अस्सल खवय्यांना मिसळ आठवतेच. त्याशिवाय मित्रमंडळींना एकत्र जमविण्यासाठीही मिसळ हेच निमित्त असते.

या सर्व बाबी लक्षात घेऊन हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात सर्व वयोगटातील लोकांना सहभागी होता येईल. राज मसाले आणि अक्कुदास ट्रेडिंग हे या उत्सवाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. तर केळकर हाउसिंग हे रिअल इस्टेट आणि ऑटो पार्टनर ‘नमः शिवाय हीरो’ हे आहेत.

हे लक्षात ठेवा

कधी : २६, २७ आणि २८ एप्रिल

कुठे : बोगनवेल फार्म, डी. पी. रस्ता, म्हात्रे पुलाजवळ, पुणे

वेळ : सकाळी ९ ते रात्री ९

पार्किंग : मोफत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com