Sakal Money Diwali Ank 2023 : आर्थिक श्रीमंती आणि समाधान यांचा मेळ घालणे आवश्‍यक - समित वर्तक

समित वर्तक यांचे मत; ‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन
Sakal Money Diwali Ank 2023 issue financial wealth samit vartak pune
Sakal Money Diwali Ank 2023 issue financial wealth samit vartak puneSakal

पुणे : ‘‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकांची ‘श्रीमंत व्हायचंय मला...’ ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असून, लोकांना आर्थिक श्रीमंती आणि सुख-समाधान यांचा मेळ घालण्याबाबत मार्गदर्शक ठरेल. हे फार मोलाचे काम आहे,’’ असे मत ‘सेजवन इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स’ या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी समित वर्तक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

‘सकाळ मनी’च्या पाचव्या दिवाळी अंकाचे प्रकाशन समित वर्तक आणि ‘आयआयएफएल सिक्युरिटीज’च्या पश्चिम विभागाच्या बीटूबी ब्रोकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख अरुण कुमार यांच्या हस्ते आज झाले. या वेळी ‘सकाळ माध्यम समूहा’चे सीओओ महेंद्र पिसाळ, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘सकाळ मनी’चे संपादक मुकुंद लेले, ‘सकाळ साप्ताहिक’चे संपादक माधव गोखले आदी उपस्थित होते.

वर्तक म्हणाले, ‘‘मूलभूत बाबी सुधारल्या असल्याने भारतीय अर्थव्यवस्था मजबूतपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षांत गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे. भारतीय उद्योग क्षेत्राची स्थिती सध्या अत्यंत भक्कम आहे. व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे परदेशातील गुंतवणूकही वाढत असून शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम संधी आहे.’’ ‘सकाळ मनी’ मराठीत असल्याने अगदी गावागावातील लोकांनाही आर्थिक विषयांबाबतचे लेखन सहजपणे वाचता येईल आणि याबाबतची जागरूकता वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

Sakal Money Diwali Ank 2023 issue financial wealth samit vartak pune
Pune Crime : तरुणाला नग्न करून नाचण्यास भाग पाडले; चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘फंड मॅनेजरची मदत घ्यावी’

‘‘शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांची मदत घेणे अधिक सोयीचे आहे,’’ असा सल्ला अरुण कुमार यांनी दिला. ‘‘फंड मॅनेजर होणे ही दीर्घकालीन प्रकिया आहे. प्रत्येकाला ते शक्य नसते. त्यामुळे डेटा जमवणे, त्याचे विश्लेषण करणे आदी बाबी तंत्रज्ञानाच्या साह्याने तज्ज्ञ मंडळी सतत करत असतात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हे शक्य नसते, त्यामुळे तज्ज्ञ फंड मॅनेजरची मदत घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे,’’ असे ते म्हणाले. आर्थिक बाबींविषयी सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात ‘सकाळ मनी’ मासिक महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Sakal Money Diwali Ank 2023 issue financial wealth samit vartak pune
Pune Crime News : खिशातून पाचशे रुपये घेतल्याने तरुणाचा खून; खराडी परिसरातील घटना, आरोपीला अटक

या अंकाच्या निर्मितीत सहभागी झालेल्या सहकाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुकुंद लेले यांनी ‘सकाळ मनी’ दिवाळी अंकाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सकाळ मनी’च्या उपसंपादक प्राची गावस्कर यांनी केले.

‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये...

‘श्रीमंत व्हायचंय मला...’ या संकल्पनेवर आधारित विशेष लेख आर्थिक समृद्धी आणि सुख-समाधान यांची सांगड कशी घालावी, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शक लेख व्यक्तिगत आर्थिक नियोजन, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, सोने, करप्रणाली, बँकिंग, विमा, यशदायी लेखांसह तज्ज्ञांचे विश्लेषणात्मक लेख, विविध नामवंतांच्या मुलाखती, भविष्य, टॉप १० शेअर असा भरगच्च वाचनीय मजकूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com