अभियंत्यासह दोघांवर कारवाई

अभियंत्यासह दोघांवर कारवाई

पुणे - धायरी येथील वीजचोरी प्रकरणात अखेर महावितरणने सहायक अभियंत्यासह वीजवाहिनी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. महावितरणने वीजचोरीची दखल घेऊन कारवाई केली असली, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र अभय दिले आहे.

धायरी परिसरातील कालव्यात भगदाड पाडून पाणी चोरी करून ते विहिरीत आणले जात होते आणि विहिरीतून ते पाणी टॅंकरमध्ये भरून त्याची विक्री केली जात होती. हा प्रकार ‘सकाळ’ने नुकताच उघडकीस आणला होता. 

महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वीजचोरी झाल्याचे उघड झाले होते. याला दोन आठवड्यांचा कालावधी होऊनही महावितरणकडून त्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती.  याबाबत नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त होत होते.

अखेर महावितरणकडून धायरी येथून नुकतेच बदली झालेले सहायक अभियंता उमेश सासणे आणि वीजवाहिनी कर्मचारी दत्तू कसबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. याविषयी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे म्हणाले, की या दोघांना आरोपपत्र देऊन खुलासा मागविण्यात आला आहे.  

तो प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सासणे यांची बढती होऊन एक महिन्यापूर्वीच तेथून बदली झाली आहे. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार एका साहाय्यक अभियंत्याकडे  आहे. 

भरारी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्या वेळी अतिरिक्त कार्यभार असलेले साहाय्यक अभियंता उपस्थित नव्हते. तसेच, या प्रकरणाची पाळेमुळे वरपर्यंत गेली असून, वरिष्ठांवर कारवाई होणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

केवळ ४ लाखांचे बिल  
एका पॉइंट मालकाला दंडासहित वीजबिल दिले आहे. ते केवळ चार लाख रुपयांचे आहे. वास्तविक त्याच्याकडून गेली दहा वर्षे वीजचोरी होत असताना एवढे कमी बिल कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com