अभियांत्रिकी, वैद्यकीयच्या प्रवेशासाठी ‘सकाळ’चे पोर्टल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे; पण त्यासाठी प्रवेश परीक्षांची तयारी झाली नसेल, तर काळजी करू नका. तुमच्याबरोबर ‘सकाळ’ आहे. आम्ही तुमची प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणार आहोत एका पोर्टलद्वारे. त्यामुळे काळजी सोडा आणि ‘सकाळ’च्या उपक्रमात सहभागी व्हा.

पुणे - अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे; पण त्यासाठी प्रवेश परीक्षांची तयारी झाली नसेल, तर काळजी करू नका. तुमच्याबरोबर ‘सकाळ’ आहे. आम्ही तुमची प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणार आहोत एका पोर्टलद्वारे. त्यामुळे काळजी सोडा आणि ‘सकाळ’च्या उपक्रमात सहभागी व्हा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वत्र लॉकडाउन आहे. शाळा, महाविद्यालये अगदी खासगी क्‍लासही बंद आहेत; पण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तोंडावर आल्या आहेत. यासाठी कुणाचे मार्गदर्शन घ्यायचे तरी ते विद्यार्थ्यांना शक्‍य नाही. तुमची ही चिंता दूर करण्यासाठी ‘सकाळ’ने एक पाऊल टाकले आहे. ‘सकाळ’ने बारावीची परीक्षा दिलेल्या आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे.

अजित पवारांच्या बैठकीकडे शहरातील सोसायट्यांचे लक्ष; का? वाचा सविस्तर!

विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या www.sakalntrance.com या पोर्टलवर विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी, जेईई-मेन्स, ॲडव्हान्स्ड, BITSAT आणि नीट या परीक्षांचे मॉक टेस्ट अत्यंत माफक दरात देता येतील. या मॉक टेस्टसाठी आयआयटीपी/एन्ट्रन्स मास्टर संस्था सकाळची पार्टनर आहे. लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना क्‍लासेसला जाता येत नाही. परीक्षाही लांबल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ‘सकाळ’चे पोर्टल विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे उपयोगी पडणार आहे.

प्रवेशाचा तपशील
पोर्टल : www.sakalntrance.com
कुणासाठी : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
काय करावे : सुरुवातीला पोर्टलवर जावे. तिथे नोंदणी करावी. नंतर आवश्‍यक टेस्ट सीरिज निवडावी. त्याचे शुल्क भरावे आणि टेस्ट सीरिज घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२९१३५१०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal portal for engineering medical admission