esakal | ‘सकाळ रिलीफ फंडा’मार्फत ‘बेड’ व ‘ऑक्सिजन सिलिंडर’ उपलब्ध करून देणार
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Relief Fund

‘सकाळ रिलीफ फंडा’मार्फत ‘बेड’ व ‘ऑक्सिजन सिलिंडर’ उपलब्ध करून देणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याच्या विविध भागांत सध्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. हा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील असल्या तरी, वाढत्या रुग्णसंख्येपुढे त्या कमी पडत आहेत. अशा संकटांच्या प्रसंगी सामाजिक जबाबदारी म्हणून ‘सकाळ’ने कायमच पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शासकीय, खासगी कोविड केअर सेंटरमध्ये ‘बेड’ व ‘ऑक्सिजन सिलिंडर’ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून समाजातील विविध घटक, दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर आदी विविध जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी बेड वेळेत उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजन सिलिंडर असलेल्या बेडचीही संख्या कमी पडत आहे. त्यातच व्हेंटिलेटर असलेले बेडही वाढत्या रुग्णसंख्येपुढे अपुरे पडत आहेत. बेड उपलब्ध न होणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा अभाव आदींमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत समाजातील घटकांनी परस्परांना मदत केली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. या जाणिवेतूनच ‘सकाळ रिलीफ फंडा’ने पुढाकार घेतला आहे. राज्याच्या विविध भागांतील कोविड केअर सेंटरमध्ये ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून ‘बेड’ आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यातून कोरोना रुग्णांना काही प्रमाणात आधार मिळेल आणि शासकीय यंत्रणांवरील ताणही कमी होऊ शकतो. त्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील घटकांनी, दानशूर व्यक्तींनी, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, खासगी उद्योग- व्यावसायिक आणि कंपन्यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन सकाळ रिलीफ फंडाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: Pune Corona Update : शहरात नवे ५,३७३ रुग्ण; ५४,६२४ रुग्णांवर उपचार सुरु

मदत करण्यासाठी

सकाळ रिलीफ फंड

HDFC Bank

A/C No : 57500000427822

IFSC : HDFC0000103

या खात्यावर रक्कम ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता.

‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक : ९९६०५००१४३