Sakal Saptahik Anniversary : ‘सकाळ साप्ताहिक’च्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. प्रमोद चौधरी यांच्या मुलाखतीचे आयोजन

‘सकाळ साप्ताहिक’च्या वर्धापन दिनानिमित्त ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
Pramod Chaudhary
Pramod Chaudharysakal

पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’च्या वर्धापन दिनानिमित्त ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी (ता. १ ऑक्टोबर) मॉडर्न कॉलेज रस्त्यावरील मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून सर्वांसाठी खुला आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

डॉ. चौधरी यांनी १९८३-८४मध्ये स्थापन केलेली प्राज इंडस्ट्रीज आजमितीला जैवइंधन क्षेत्रात तंत्रज्ञान आणि तद्अनुषंगाने सेवा देणारी भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. डॉ. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ‘प्राज’ने शेतातील कचऱ्यापासून नूतनीकरणक्षम इंधन (रिन्युवेबल फ्युएल), बायो-फ्युएल, बायो-केमिकल्स तयार करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे.

टाकाऊ शेतमालापासून टू-जी तंत्रज्ञानावर आधारित इथेनॉल बनविणाऱ्या बायो-रिफायनरीचा पथदर्शी प्रकल्प उभारणारी ‘प्राज’ ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. देशातील आघाडीच्या इंधन तेलाच्या कंपन्यांतर्फे उभारण्यात येत असलेल्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये ‘प्राज’चे तंत्रज्ञान वापरले जात आहे.

वाहनांमध्ये वापरता येणाऱ्या जैवइंधनाबरोबरच आता शाश्वत हवाई इंधनही प्राजने तयार केले असून अलीकडेच प्रवासी विमानासाठीही या इंधनाची यशस्वी चाचणी झाली आहे. नजीकच्या भविष्यकाळात पारंपरिक इंधनात विशिष्ट प्रमाणात शाश्वत हवाई इंधन मिसळणे सर्व विमान वाहतूक कंपन्यांना बंधनकारक असणार आहे.

डॉ. चौधरी आणि प्राज इंडस्ट्रीजला त्यांच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे अमेरिकेतील ‘बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन’ (बीआयओ-बायो) या संस्थेतर्फे प्रदान करण्यात आलेला ‘जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर’ पुरस्कार. २०२०मध्ये डॉ. चौधरी यांना या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे डॉ. चौधरी हे पहिलेच भारतीय आणि दुसरे आशियायी व्यक्ती आहेत.

‘सकाळ साप्ताहिक’ येत्या सोमवारी (ता. २ ऑक्टोबर) ३७व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आजवर ‘सकाळ साप्ताहिक’ने मराठी नियतकालिकांच्या विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करताना वाचकांशी थेटपणे जोडले जाणारे अनेक विषय हाताळले आहेत, अनेकांना लिहिते केले आहे. विविध विषयांवरील विशेषांक आणि मुखपृष्ठ कथा हे ‘सकाळ साप्ताहिक’चे वैशिष्ट्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com