वैविध्यपूर्ण आणि डिझायनर फर्निचरचा नजराणा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

कधीपर्यंत ः रविवारपर्यंत (ता. 29) 
केव्हा ः सकाळी अकरा ते रात्री नऊ 
कुठे ः कृषी महाविद्यालयाचे मैदान, (सिंचननगरजवळ), रेंजहिल्स 
पार्किंग व प्रवेश मोफत 

पुणे - सागवानी लाकडाचे आणि लोखंडी डिझायनर फर्निचर...जोडीला म्युरल्स, फ्रेम्स, मूर्ती अन्‌ आर्टिफिशल फुले आदी घराला घरपण देणाऱ्या गृहसजावटीच्या वस्तूंच्या खरेदीला "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'मध्ये रविवारी उधाण आले होते. नावीन्यपूर्ण आणि आकर्षक अशा फर्निचर व गृहसजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वैविध्यपूर्ण आणि डिझायनर फर्निचरचा नजराणा प्रदर्शनात पाहायला मिळाला. 

इर्म्पोटेड फर्निचरपासून ते इटालियन फर्निचरपर्यंतचे अनेक प्रकार या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून, 29 जानेवारीपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. विविध कंपन्यांची दर्जेदार उत्पादने, पाचशेहून अधिक स्टॉल्स, भरघोस सवलती आणि एक्‍स्चेंज ऑफर्स उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणेकरांनी विशेष सवलती मिळवून खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. गृहोपयोगी ते इलेक्‍ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. 

फर्निचरमध्ये नावीन्यता, कलाकुसर आणि रंगसंगतीचा अनोखा मिलाफ पाहायला मिळेल. सागवानी लाकूड ते लोखंडापासून तयार केलेले फर्निचरचे प्रकार प्रदर्शनातील वैशिष्ट्य आहे. फर्निचरमध्ये डिझायनर सोफा सेट, सोफा कम बेड, बेडरूम पॅकेजेस, किचन्स सेट्‌स, डायनिंग सेट्‌स, झोपाळा, वॉडरोब्ज, ड्रेसिंग टेबल, ऑफिस चेअर्स, सेंटर टेबल्स, बीन बॅग्ज दिवाण सेट, मिनी सिटिंग सेट, सोफा सेट्‌स, अँटिक फर्निचर, पिकनिक टेबल, आयर्निंग टेबल्स, मसाज चेअर्सही उपलब्ध आहेत. 

गृहसजावटीसाठी लागणारी निरनिराळी भित्तिचित्रे, फ्रेम्स, पडदे, चादरी, कार्पेट्‌स, कुशन्स, फुलदाण्या, आर्टिफिशल फुलेदेखील पाहता येतील. फर्निचरमध्ये वेगळी कलाकुसर आणि कल्पकता पाहायला मिळेल. कौशल्यपूर्ण आणि विविधांगी वस्तू हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. येत्या रविवारपर्यंत (ता. 29) सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन खुले असेल. 

Web Title: sakal shopping festival 2017