मनसोक्त खरेदी अन्‌ लज्जतदार खाद्यपदार्थ ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कालावधी - रविवारपर्यंत (ता. 29) 
स्थळ - रेंजहिल्स येथील कृषी महाविद्यालय मैदान (सिंचननगर जवळ) 
वेळ ः सकाळी अकरा ते रात्री नऊ 
पार्किंग व प्रवेश मोफत 

पुणे - मनसोक्त खरेदी करत, लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पुणेकरांनी "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'ला मंगळवारी गर्दी केली. प्रदर्शनात खासकरून महिला आणि तरुणींसाठी आकर्षक व डिझायनर दागिने, फुटवेअर, कपडे, पर्स, साड्यांमधील वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. मोत्यांच्या, खड्यांच्या, आर्टिफिशल आणि गोल्ड प्लेटेड दागिन्यांमधील वैविध्यता महिला आणि तरुणींना आकर्षित करीत आहे. 

पारंपरिकतेच्या जोडीला पाश्‍चिमात्य डिझाइनमधील विविध प्रकार प्रदर्शनात पाहता येतील. इमिटेशन, अँटिक, कोरियन, इटालियन आणि अस्सल पारंपरिक भारतीय दागिने या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्यातील नावीन्यपूर्ण कलाकुसर आणि वैविध्यता नक्कीच महिला- तरुणींना आवडेल. लग्नसराईत नववधूसाठी दागिन्यांचे मॅचिंग सेट्‌सही पाहावयास मिळतील. खड्यांचे, अमेरिकन डायमंडचे, मोत्यांचे आणि इमिटेशन दागिन्यांचे सेट्‌सही येथे असून मागणीनुसारही हे दागिने तयार करून मिळणार आहेत. गोल्ड प्लेडेट दागिन्यांच्या जोडीला पारंपरिक दागिन्यांसह फॅन्सी दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगड्या, अंगठ्या, कानातले आणि ब्रेसलेटमध्ये विविध प्रकार पाहता येतील. तर साड्या, कुर्ते, जिन्स, प्रिटेंड टी-शर्ट, प्लाझो-कुर्ता, दुपट्टा अशा कपड्यांच्या कित्येक व्हरायटी येथे आहेत. कॉटन कुर्ता, अनारकली ड्रेस मटेरिअल, कॉटन ड्रेस मटेरिअलमध्ये नावीन्यपूर्ण डिझाइन असून, पर्समधील रंगसंगतीही तरुणींना नक्कीच भावेल.

सौंदर्यप्रसाधने, परफ्युम, फुटवेअरही महिला-तरुणींसाठी आहेत. खात्रीशीर खरेदी व दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये पाचशेहून अधिक स्टॉल्स आहेत. महिला-तरुणींसाठी दागिने, कपडे, पर्सेस, परफ्युम आणि गिफ्ट आर्टिकल्स, तर लहानग्यांसाठी शैक्षणिक पुस्तके, मनोरंजक खेळणी, ध्वनिफिती व फुटवेअर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि वाहनेही येथे पाहता येतील. पुरुषांसाठी कपडे, परफ्युम, वॉलेट्‌स आणि सन ग्लासेस आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. 29) सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत रेंजहिल्स येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पाहावयास खुले राहील. 

कालावधी - रविवारपर्यंत (ता. 29) 
स्थळ - रेंजहिल्स येथील कृषी महाविद्यालय मैदान (सिंचननगर जवळ) 
वेळ ः सकाळी अकरा ते रात्री नऊ 
पार्किंग व प्रवेश मोफत 

Web Title: sakal shopping festival 2017