"सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018' आजपासून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - एकाच छताखाली अगदी कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती वस्तू मिळणार असेल, तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता येतो. हाच आनंद पुणेकरांना मिळावा म्हणून उद्यापासून "सकाळ माध्यम समूहा'तर्फे "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018'चे पंडित फार्म्स, कर्वेनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये 10,000 हून अधिक प्रॉडक्‍ट्‌स आणि 200 हून अधिक स्टॉल्सची रेलचेल राहणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

होम अप्लायन्सेस, कार, फर्निचर, इंटिरियर डेकोरेशनची उत्पादने, किचनमधील वस्तू, कपडे, फॅशन ऍक्‍सेसरीज्‌, ज्वेलरी, फूटवेअर, फूड प्रॉडक्‍टस्‌, खेळणी आणि गेम्स, गिफ्ट आणि नोव्हेल्टिज्‌, हेल्थ प्रॉडक्‍ट, मसाज इक्विपमेंट, सोलर वॉटर हिटर अशा कितीतरी वस्तूंचे स्टॉल इथे पाहायला मिळणार आहेत. 6 ते 10 डिसेंबरदरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये गरजेच्या प्रत्येक वस्तूचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे थेट उत्पादक आणि होलसेलर्स यांच्याकडून खरेदी करता येणार आहे. याशिवाय आकर्षक ऑफर्स, फ्री गिफ्ट, लाइव्ह डेमो आणि मोठ्या डिस्काउंटचाही आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर मग या फेस्टिव्हलला भेट द्या. 

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल - 2018 
कुठे - पंडित फार्म्स, म्हात्रे ब्रिज आणि राजाराम पुलाच्या मधील डी. पी. रस्ता, कर्वेनगर, पुणे 
कधी - आज दि. 6 ते 10 डिसेंबर 
वेळ - सकाळी 11 ते रात्री 9 
प्रवेश फी - 10 रु प्रत्येकी 
पार्किंग मोफत

Web Title: Sakal Shopping Festival 2018 from today