करा मनासारखे शॉपिंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलचे शुक्रवारपासून आयोजन

पुणे - हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटावा, असे प्रत्येकालाच वाटते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये दहा हजारपेक्षा जास्त वस्तूंची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

एकाच छताखाली अगदी कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती प्रत्येक वस्तू मिळणार असेल तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता येतो. हाच आनंद पुणेकरांना मिळावा म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचननगर, शिवाजीनगर येथे सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. 

२० ते २९ जानेवारीदरम्यान रोज सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये गरजेच्या प्रत्येक वस्तूचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे थेट उत्पादक आणि होलसेलर्स यांच्याकडून खरेदी करता येणार आहे. याशिवाय आकर्षक ऑफर्स, फ्री गिफ्ट, लाइव्ह डेमो आणि मोठ्या डिस्काउंटचाही आनंद लुटता येणार आहे. याठिकाणी होम अप्लायन्सेस, कार, फर्निचर, इंटिरियर डेकोरेशनचे उत्पादने, किचनमधील वस्तू, कपडे, फॅशन ॲक्‍सेसरीज, ज्वेलरी, फूट वेअर, फूड प्रॉडक्‍ट्‌स, खेळणी आणि गेम्स, गिफ्ट आणि नोव्हेल्टीज, हेल्थ प्रॉडक्‍ट, मसाज इक्विपमेंट, सोलर वॉटर हिटर अशा कितीतरी वस्तूंचे स्टॉल इथे पाहायला मिळणार आहे.

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल २०१७
कुठे - ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउड, सिंचननगर, रेंज हिल्स शिवाजीनगर
कधी - २० ते २९ जानेवारी
वेळ - सकाळी ११ ते रात्री ९
प्रवेश आणि पार्किंग मोफत

Web Title: sakal shopping festival