मनसोक्त खरेदीची शेवटची संधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

पुणे - एकाच छताखाली अनेक दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणाऱ्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला शनिवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किचन अप्लायन्सेसपासून ते डिझायनर फर्निचरमधील नानाविध प्रकारांची खरेदी नागरिकांनी केली. रविवारी (ता. २९) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने भरघोस सवलती आणि ५०० हून अधिक स्टॉल्सवर खरेदीचा आनंद घेता येणार आहे.

महिला-तरुणींचा कपडे, दागिने, फूटवेअर, सौंदर्य प्रसाधने आणि गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीकडे कल होता. फर्निचर आणि गृहसजावटींच्या वस्तूंची खरेदीवरही नागरिकांचा भर होता. सुमारे ५०० हून अधिक दालने, दर्जेदार उत्पादने, नवीन कंपन्या आणि नावीन्यपूर्ण वस्तूंसह लज्जतदार खाद्यपदार्थांची जत्रा ही या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये आहे. गृहोपयोगी वस्तूंमध्ये वैविध्यता दिसून येईल. भेटवस्तूंसह गृहसजावटीच्या म्यूरल्स, चित्रे, वॉल हॅंगिंग अशा वस्तू पाहायला मिळतील.

लहानग्यांसाठी शैक्षणिक पुस्तके आणि सीडी, महिलांसाठी स्टायलिश कपडे, दागिने, फूटवेअर अशा वस्तू तर पुरुषांसाठी फूटवेअर, गॉगल, कपड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. गृहसजावटीच्या वस्तू, फर्निचरचे विविध प्रकार, किचन अप्लायन्सेसमध्ये गॅस शेगड्या, इंडक्‍शन कुकर, वॉटर प्युरिफायर्स, घरगुती आटा चक्की, स्नॅक्‍स मेकर्स, वेट ग्राइंडर्स असे असंख्य प्रकार प्रदर्शनात आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना खरेदीची सुवर्णसंधी यात अनुभवता येईल. नावीन्यपूर्ण अशी असंख्य खरेदीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

अधिक माहिती
कालावधी - रविवारपर्यंत  (ता. २९)
स्थळ - रेंजहिल्स येथील (सिंचननगरजवळील) कृषी महाविद्यालय
वेळ - सकाळी ११ ते रात्री ९
प्रवेश व वाहनतळ मोफत

Web Title: sakal shopping festival in pune