"सकाळ शॉपिंग'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे -दर्जेदार कंपन्यांची उत्पादने, पाचशे स्टॉल्स, भरघोस सवलती, विविध उत्पादनांवर मोफत भेटवस्तू आणि एक्‍स्चेंज ऑफर्स उपलब्ध करून देणाऱ्या "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'ला शुक्रवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनात किचन्स अप्लायन्सेसपासून ते गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी करता येत असल्याने ग्राहकांनी गर्दी केली आहे. शनिवार व रविवार प्रदर्शनाचे शेवटचे दोन दिवस राहिल्यामुळे खरेदीसाठी खास सवलती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे खात्रीशीर, आरामदायी आणि मनमुराद खरेदी करता येईल.

प्रदर्शनाला प्रजासत्ताकदिनी म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारीही चांगला प्रतिसाद मिळाला. नवीन उत्पादनांसह आणि उत्तम दर्जा हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. विविध वस्तूंच्या खरेदीबरोबरच खवय्यांना खाद्यजत्रेत आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेता आला. किचन अप्लायन्सेसपासून ते गृहसजावटीच्या वस्तूंकडे महिलांचा कल दिसला.

शहराच्या विविध भागांतील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळाली. डिझायनर आणि क्‍लासी फर्निचरचे अनेक प्रकारही येथे आहेत. महिलांसाठी विविध डिझायनचे कपडे, दागिने, फॅन्सी पर्स, भेटवस्तू, परफ्यूम आणि सौंदर्य प्रसाधने, तर पुरुषांसाठी कपडे, फूटवेअर, घड्याळ आदी वस्तू उपलब्ध आहेत.

लहानग्यांसाठी शैक्षणिक पुस्तके, खेळ आणि सीडीज खरेदी करता येतील. शनिवार व रविवार सुटीचा दिवस असल्याने मनसोक्त खरेदीचा आनंद घेता येणार आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. 29) सकाळी अकरा ते नऊ या वेळेत रेंजहिल्स येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर खुले राहील.

कालावधी - रविवारपर्यंत (ता. 29)
वेळ ः सकाळी अकरा ते रात्री नऊ
स्थळ ः कृषी महाविद्यालयाचे मैदान, सिंचननगर जवळ, रेंजहिल्स
प्रवेश व पार्किंग मोफत

Web Title: sakal shopping festival spontaneous response