"पुल'कित विश्‍व आज उलगडणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "सकाळ'तर्फे आयोजित "पुलं'चे साहित्यविश्‍व उलगडून दाखवणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी (ता. 15) होणार आहे. कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. 

पु. ल. देशपांडे यांच्यावरील "भाई' चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते महेश मांजरेकर यांच्यासह कलाकार सागर देशमुख, अभिनेत्री अश्‍विनी गिरी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता गिरीश कुलकर्णी हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले या कलाकारांच्या मुलाखती घेणार आहेत. यानिमित्ताने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात "पुलं'च्या हास्यचित्रांसह ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी यांची दुर्मीळ छायाचित्रेही पाहता येतील. तसेच, आलोक आणि कपिल घोलप यांनी रेखाटलेली व्यंग्यचित्रे मांडण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे; मात्र प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य देण्यात येणार आहे. 

Web Title: Sakal Special cultural program Pu La Deshpande