सकाळ सुपरस्टार कप 2 जूनला रंगणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, दिनो मोरिओ, शब्बीर अहलुवालिया, करण वाही आणि पुण्यातील फुटबॉलपटूंमध्ये येत्या दोन जूनला बालेवाडीच्या स्टेडिअमवर अनोखा फुटबॉल सामना रंगणार आहे. सामाजिक कार्यासाठी निधी उभारणे, हा या प्रदर्शनीय सामन्याचा प्रमुख उद्देश आहे. 

दरम्यान, यामध्ये हाउसिंग सोसायट्यांनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्‍याचप्रमाणे त्‍यांना स्‍पर्धेच्या ठिकाणी टेंट उभे करता येतील. याबाबतचा तपशील २५ मेनंतर जाहीर करण्यात येणार आहे.‘जीएस स्पोटर्स’च्या सहकार्याने ‘सकाळ’ने हा सामना आयोजित केला आहे. ‘सकाळ’च्या या उपक्रमातील ‘व्हीटीपी इलेव्हन’ या फुटबॉलपटूंच्या टीमला तयार करण्यासाठी ‘व्हीटीपी रिॲलिटी’ने प्रायोजकत्व दिले आहे. पॉवर्ड बाय ‘फिनोलेक्‍स पाइप्स’ आणि को-पॉवर्ड बाय ‘क्वेस्ट टूर्स’ या सुपरस्टार कपमध्ये बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींबरोबर व्यावसायिक फुटबॉलपटूंचा रंगतदार सामना होईल. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या उपक्रमाचे बॅंकिंग पार्टनर आहेत.

प्रवेशिका 25 मेनंतर
‘सकाळ सुपरस्टार कप’च्या मोफत प्रवेशिका २५ मेनंतर उपलब्ध असतील. त्याची माहिती आणि तपशील दररोज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे. 

सकाळ सुपरस्टार कप
कधी - दोन जून
कुठे - श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
वेळ - सायंकाळी साडेसहा वाजता

Web Title: sakal superstar football cup bollywood star