लेट्‌स रॉक, पुणेकर!

Summersault
Summersault

‘बॉलिवूड हॉटेस्ट लाइव्ह शो’; ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’ची आज सुरवात
पुणे - ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ कॉन्सर्टबद्दलची उत्कंठा शिगेला पोचली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २८) बॉलिवूड स्टार फरहान अख्तर आणि विशाल व शेखर सहभागी होत आहेत. रविवारी (ता. २९) या कॉन्सर्टमध्ये मिका सिंग व बादशाह यांना ऐकता येणार आहे. ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ मधील सादरीकरणाबाबत फरहान अख्तरशी देबारती पलित सिंगने साधलेला संवाद...

स्वतंत्र कलाकारांना जास्त प्रोत्साहन मिळायला हवे
फरहान अख्तरला निरनिराळ्या माध्यमात काम करायला आवडते. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, संगीत आणि लेखन अशा सर्वच क्षेत्रांत त्याने काम केले आहे. संगीत क्षेत्रात मात्र त्याने त्याचे विशेष स्थान निर्माण केले आहे. आपल्या बॅंडसोबत लाइव्ह परफॉर्मन्स करणे असो, वा चित्रपटात पार्श्‍वगायन करणे असो, फरहान कायम संगीतामध्ये निरनिराळे प्रयोग करत असतो.

संगीत ही जीवनातील अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. संगीताशिवाय जगण्याची कल्पनाच फार दु:खदायक आहे. असे तो म्हणतो. ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ या कार्यक्रमाबद्दल बोलताना फरहान म्हणतो, ‘‘प्रेक्षकांसोबत जल्लोष करण्याची ही आमची चौथी मैफल आहे. पुण्यात कार्यक्रम करणे हे कायम उत्साहपूर्ण आहे. पुण्यातल्या परफॉर्मन्ससाठी मी अतिशय उत्सुक आहे.

स्टुडिओतील परफॉर्मन्सविरुद्ध लाइव्ह परफॉर्मन्स
फरहानने ‘रॉक ऑन’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘शादी के साइड इफेक्‍ट’ आदी चित्रपटांत पार्श्‍वगायन केलेले आहे. तुला कुठला परफॉर्मन्स जास्त आवडतो, या विषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘मला थेट रंगमंचावर परफॉर्म करायला आवडते. अर्थात, त्यासाठी तुम्ही स्टुडिओत चांगले काम केलेले पाहिजे. पुढे तो म्हणाला, ‘‘रंगमंचावर कार्यक्रम करताना खूप आनंद मिळतो. कारण तुम्ही प्रेक्षकांशी थेट जोडले जाता, त्यांचे मनोरंजन करता.’’
फरहानला इतक्‍या वर्षांनंतर तू परफॉर्मन्स करताना जरा नर्व्हस झाला का, असे विचारले असता तो म्हणाला, ‘‘सुरवात होण्याआधी मनात थोडी धाकधूक असते, कारण प्रत्येक शो चांगला व्हायला हवा. कार्यक्रमाला सुरवात होण्याआधी त्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करायला हवे. माझ्यासाठी ती वेळच जास्त महत्त्वाची असते. एकदा मंचावर गेलो आणि ते संगीत, लोकांचा उत्साह, ऊर्जा पहिली की मग आपणही तो शो एन्जॉय करतो.’’

संगीताची प्रेरणा प्रत्येक कलाकाराची शैली असते किंवा कोणा व्यक्तीकडून घेतलेली ती प्रेरणा असते. फरहान म्हणतो, ‘‘माझी सगळ्यात मोठी प्रेरणा ‘बीटल्स’ आहे. इटॅनिक बॅंडने खरे तर मला गायन आणि गिटार यांच्याजवळ आणले. तो बॅंड माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बॅंड आहे.’’

स्वतंत्रपणे काम करताना
बॉलिवूड संगीत करण्याबरोबरच त्याने त्याचे स्वतःचे ‘वुई आर ऑन द गुडसाइड’सारखे रिलीज केले आहे. राम संपत, शंकर-एहसान-लॉय आणि सुलेमानसारख्या संगीतकारांबरोबर स्वतंत्ररीत्या काम केले आहे.

त्याच्यासाठी असे स्वतंत्ररीत्या काम करणे किती महत्त्वाचे आहे, या विषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळे भारतीय संगीत ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. माझ्यासाठी चित्रपाटासाठी संगीत देणे असो वा स्वतंत्रपणे काम करणे असो त्यात अभिव्यक्ती महत्त्वाची आहे. आपल्याकडे खरे तर स्वतंत्र कलाकारांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांना व्यासपीठे उपलब्ध करून द्यायला हवीत. संगीतकार म्हणून आपले वेगळे करिअर घडविण्याचे आव्हान सर्व संगीतकारांपुढे आहे.

तुम्हाला संगीत आवडते; परंतु उर्वरित आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे? फक्त छंद म्हणून संगीताकडे न बघता आपली कौशल्ये, प्रतिभा त्यावर केंद्रित करायला हवी. भारतात अनेक जण आता यू- ट्यूबवर आपली गाणी रिलीज करतात. परंतु यू- ट्यूबवर गाणे रिलीज करणे आणि संगीतामध्ये करिअर करणे या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. मला वाटते आपल्या देशात संगीताला अतिशय महत्त्व दिले जाते. आपले भावविश्‍व संगीताने व्यापले आहे. त्यामुळे संगीत कलाकारांना ‘स्टार’ होण्यासाठी पुरेपूर संधी आहे. केवळ लोकप्रिय चित्रपटांपुरते मर्यादित न राहता आपल्यातील कलाकाराला, प्रतिभेला अधिक उत्तेजन द्यायला हवे.’’ 

कधी आणि कोठे
 आज - २८ एप्रिल 
 सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
 उद्या - २९ एप्रिल 
 सहभाग - मिका सिंग, बादशाह 
 कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
 केव्हा - संध्याकाळी 
६ वाजल्यापासून
 ऑनलाइन बुकिंगसाठी, अधिक माहितीसाठी संपर्क ः ९०११०८५२५५ 
 प्रवेशिका bookmyshow.com (फक्त सायंकाळी ५ पर्यंत) व प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी ११ पासून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com