दसऱ्याच्या मुहूर्तावर घर घेण्याची सुवर्णसंधी

Vastu-Logo
Vastu-Logo

पिंपरी - दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शनिवारी (ता. ५) व रविवारी (ता. ६) चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे. 

शहराच्या विविध भागातील ‘रेरा’ नोंदणीकृत गृहप्रकल्पांची माहिती ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे.  बांधकाम प्रकल्प, त्यांचे बजेट, सुविधा, गुंतवणुकीचे ठिकाण, तेथील विकास अशा विविध प्रश्‍नांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय पाहता येणार आहेत. त्यामुळे हा एक्‍स्पो तुमच्या मनातील घर पूर्ण करण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. त्यात १५ लाखांपासून पुढील किमतीची घरे उपलब्ध आहेत. 

निसर्गरम्य ‘सेकंड होम’साठी आकर्षक ‘प्लॉट’चे पर्यायही उपलब्ध आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर स्पॉट बुकिंग ऑफर, नामवंत बांधकाम व्यावसायिकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

रावेतमध्ये आमचे प्रकल्प बजेट होमपासून लक्‍झरी होमपर्यंत आहेत. त्याच बरोबर मान्यताप्राप्त ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्‍टही उपलब्ध आहेत. या प्रदर्शनाला अनेकांनी भेट देऊन आपले घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. या वर्षीसुद्धा प्रदर्शनाला भेट देऊन विविध गृहप्रकल्पांची माहिती घ्यावी.
- राजेश पटेल, मार्केटिंग डिव्हिजन, पोलाईट ग्रुप  

प्रशस्त रस्ते, पार्किंग या सुविधेसह हे गृहप्रकल्प ग्राहकांना आकर्षित करत आहेत. परवडणारी घरे व शहरानजीक राहण्याची संधी यामुळे ग्राहकांना मिळणार आहे. दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांनी आपल्या घराचा प्रारंभ नक्की करावा, असे वातावरण सध्या आहे. प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी.
- सागर मारणे, संचालक, विठ्ठल कॅपिटल 

रावेतमधील नम्रता ग्लोरियाच्या पहिल्या दोन्ही फेजला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने असलेले विविध गृहप्रकल्प पाहण्यासाठी आवर्जून भेट देण्यासारखे हे प्रदर्शन असते. 
- रवींद्र नामदे, संचालक, नम्रता कन्स्ट्रक्‍शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com