पिंपरी-चिंचवडमध्ये घ्या हक्काचे घर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे दोनदिवसीय सकाळ वास्तू एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या उद्योगनगरीत आपले घर, बंगलो, ऑफिस अथवा, प्लॉट असावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

पिंपरी-चिंचवड, तळेगाव, आळंदी, चाकण परिसरातील ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १२५  हून अधिक प्रकल्पांची माहिती येथे उपलब्ध होणार आहे. शहर परिसरातील प्रकल्पांची सविस्तर माहिती येथे मिळेल. विविध प्रकल्प, त्यांचे बजेट, सुविधा, जास्त फायद्याची गुंतवणूक, तेथील परिसराचा विकास, अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे यातून मिळणार आहेत. 

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘वास्तू एक्‍स्पो’मध्ये परवडणाऱ्या घरांची मोठी शृंखला सादर करणार आहे. याशिवाय, लक्‍झ्युरियस घरांचीही माहिती मिळणार आहे. परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरापर्यंत सर्व काही, शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटी, लोकेशन, आसपासचा परिसर अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. 

या प्रदर्शनात एकाच छताखाली घर, एनए प्लॉट्‌स, ऑफिससाठी जागा यांसारख्या सर्व प्रकल्पांतील घरांची माहिती मिळणे ही ग्राहकांसाठी पर्वणी ठरणार आहे. नामवंत बांधकाम व्यावसायिकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ यात घेता येणार आहे.

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो
 कधी - २६ व २७ मे २०१८
 कुठे - ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, चिंचवड 
 वेळ - सकाळी ११ ते रात्री ८

Web Title: sakal vastu expo